उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःएका अपक्ष उमेदवाराला धमकावल्याबद्दल आघाडीचे (राष्ट्रवादी) चिंचवडमधील उमेदवार राहूल कलाटे यांच्याविरुद्ध काळेवाडी पोलिस अदखलपात्र गुन्हा (एनसी) गुन्हा काल रात्री नोंदविण्यात आला. या निवडणुकीतील शहरात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.दरम्यान,आपल्या अर्ज भरण्याच्या वेळी झालेली गर्दी पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे,अशी प्रतिक्रिया त्यावर कलाटेंनी आज दिली.
कलाटेंनी काल अर्ज भरला.त्यावेळी त्यांनी तू कशाला अर्ज भरतोस,तो भरला,तर तुला मारून टाकेन,अशी धमकी दिल्याची तक्रार जावेद शेख वय ३५,रा.वाकड) या अपक्ष उमेदवाराने दिली.त्यावरून ही एनसी दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, अशा गुन्ह्यात अटकेसारखी कारवाई होत नाही.फक्त त्यातील आरोपीला पोलिस समज देतात.शेख हे वंचित बहूजन आघाडी कडून अर्ज भरणार होते.म्हणून आपल्याला काही मते मिळणार नाही,या भीतीतून कलाटेंनी धमकावल्याचे शेख यांनी आज आपला आवाजशी बोलताना सांगितले.तसेच वंचितचा एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून भरलेला अर्ज वैध ठरल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
थेरगाव येथील चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाबाहेर (पिंपरी महापालिकेचे ग प्रभाग कार्यालय) काल दुपारी अ़डीच वाजता हा प्रकार घडला.शेख यांच्या तक्रारीनुसार अपक्ष अर्ज भरल्यानंतर ते वंचितच्या एबी फॉर्मची वाट पाहत थांबले होते.त्यावेळी कलाटेंनी येऊन धमकी दिली माझ्या हातातील कागदपत्रे फेकून दिली,असे शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर दर निवडणुकीला शेख हा उभा राहतो असे सांगत ही मोठी निवडणूक असल्याने तू उभा राहू नकोस,एवढे मी त्याला बोललो होतो,असे स्पष्टीकरण कलाटेंनी त्यांच्याविरुद्ध दाखल एनसीवर दिले.मी अर्ज भरताना झालेले शक्तीप्रदर्शन पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे ते म्हणाले.