बनसोडेंनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा करीत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची प्रतिस्पर्धी उमेदवार धर यांची मागणी

पिंपरीमध्ये छाननीत ट्विस्ट,युती उमेदवाराने कोट्यवधींची संपत्ती दडविल्याचा आघाडीच्या उमेदवाराचा आक्षेप

उत्तम कुटे
पिंपरीःपुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघाच्या अर्ज छाननीत आज मोठा ट्विस्ट आला. युतीचे (राष्ट्रवादीचे) उमेदवार अण्णा बनसोडे यांनी खोटे,दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा करीत त्यांची उमेदवारी रद्द करण्यााची मागणी प्रतिस्पर्धी आघाडीच्या (राष्ट्रवादी)उमेदवार सुलक्षणा शिलवंत- धर यांनी केली.त्यामुळे बनसोडेंची उमेदवारी धोक्यात आली आहे.परंतू, निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.

काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी बनसोडे आणि धर या दोघांनीही आपली उमेदवारी दाखल केली. धर यांनी चपळाई दाखवित बनसोडेंच्या प्रतिज्ञापत्रातील उणीवा लगेच हेरल्या.त्यावर आज छाननीत आक्षेप सुद्धा घेतला.मुळात ज्या फारमॅटमध्ये प्रतिज्ञापत्र भरायला पाहिजे,ते बनसोडेंनी भरलेले नाही,या तांत्रिक चुकीकडेही धर यांनी लक्ष वेधले. तसेच त्यात बनसोडेंनी आपली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता लपविली असल्याचे पुरावे त्यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्याकडे सादर केले. बनसोडेंची चिखली गट नंबर 1596 मधील 60 गुंठे जमीन ते अध्यक्ष असलेल्या सिद्धार्थ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या नावावर असून चिखली गट क्रमांक 15 93 येथील 41 गुंठे जमीन ही याच संस्थेच्या नावावर असलेल्या बाबीचा उल्लेख बनसोडेंच्या शपथपत्रात नसल्याचा दावा धर यांनी केला आहे.या जागेच्या सातबारावर संस्थेचे अध्यक्ष म्हणून अण्णा दादू बनसोडे यांचे नाव आहे.त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत सुद्धा अशी हेराफेरी केल्याचा आरोप धर यांनी केला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने 9 मे 2014 रोजी किसन शंकर कठोरे विरुद्ध अरुण दत्तात्रय सावंत व इतर यांच्या संदर्भात दिलेल्या निकालाचा संदर्भ त्यांनी आपल्या आक्षेपांच्या समर्थनार्थ दिला.जर, एखाद्या उमेदवारासंदर्भात पुराव्यानिशी हरकत नोंदवली असेल तर त्याचा उमेदवारी अर्ज तात्काळ बाद करण्यात यावा असे या निकालात म्हटलेले आहे. त्यामुळे त्यानुसार बनसोडेंनी दाखल केलेले शपथपत्र चुकीचे असून करोडो रुपयांची मालमत्ता त्यांनी लपविले असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज तात्काळ बाद करावा अशी मागणी धर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *