उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःआघाडीतील राष्ट्रवादीने काल पिंपरीतील आपला उमेदवार (सुलक्षणा शिलवंत-धर) जाहीर केला.आज चिंचवड आणि भोसरी असे शहरातील बाकीचे दोन उमेदवार त्यांनी घोषित केले.अपेक्षेनुसार त्यांनी भोसरीत अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली.तर, चिंचवडला,मात्र अनपेक्षितपणे त्यांचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या आग्रहास्तव राहूल कलाटेंना ती दिल्याने पक्षातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.
दरम्यान,गव्हाणे, कलाटे या दोघांनाच तिकिट मिळणार अशी बातमी त्य़ांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी काही तास आपला आवाजने दिली होती. ती लगेच तंतोतंत खरी ठरली.तसेच चिंचवडचा आघाडीचा (राष्ट्रवादी)उमेदवार आयात असणार असेही आपला आवाजने सांगितले होते.त्यावरही कलाटेंच्या नावातून शिक्कामोर्तब झाले.तसे हे दोघेही आयातच उमेदवार म्हणता येतील. विधानसभेला भोसरीत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनाच पुन्हा तिकिट मिळणार असल्याचे नक्की झाल्याने तेथे संधी नाही हे पाहून अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गव्हाणेंनी आघाडीकडून ते मिळण्यासाठी घरवापसी तीन महिन्यांपूर्वी घरवापसी केली होती..दरम्यान,उमेदवारीची खात्री असल्याने त्यांनी अगोदरच धडाक्यात प्रचारही सुरु केला होता.त्यांचा सामना लांडगे यांच्याशी होणार आहे.या थेट लढतीत ते लांडगेंची हॅटट्रिक चुकवून भोसरीत राष्ट्रवादीचा झेंडा रोवतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्यावर्षी २६ फेब्रुवारीला झालेल्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत आघाडीत बंडखोरी करून अपक्ष लढलेल्याकलाटेंनाच आघाडीकडूनच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कारण त्यांच्या बंडखोरीमुळे पोटनिवडणुकीत आघाडीचे (राष्ट्रवादी) उमेदवार नाना काटेंचा पराभव झाल्याने शिवसेनेने माजी गटनेते असलेल्या कलाटेंवर कारवाई केली होती.त्यामुळे ते सध्या कुठल्याच पक्षात नव्हते,अशी स्थिती होती.राष्ट्रवादीत,तर त्यांचा अद्याप प्रवेशही झाला नव्हता.तरी त्यांना त्यांची उमेदवारी मिळाली,हे विशेष.त्यासाठी शरद पवारांकडे त्यांचे विश्वासू खासदार शिरुरचे डॉ.अमोल कोल्हे यांनी शब्द टाकल्याने ही जादू झाल्याचे समजते.त्यामुळे कोल्हेंचा शब्द आता कलाटेंना खरा करून दाखवावा लागणार आहे.त्यांचा सामना युतीचे (भाजप) शंकर जगताप यांच्याशी आहे.तेथे भाऊसाहेब भोईर हे ही अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. त्यामुळे पुन्हा गेल्यावेळेसारखा तिचा लाभ भाजपला होईल असा अंदाज आहे.
दरम्यान,उद्योगनगरीत तीनपैकी एकतरी जागा मिळावी,यासाठी आग्रही असलेल्या आघाडीतील ठाकरे शिवसेनेला ती एकही न मिळाल्याने त्यांच्या पक्षात शहरात मोठी नाराजी पसरली आहे.पिंपरीसाठी ते अग्रही होते. परंतू,ती ही न मिळाल्याने आता ते काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.त्यामुळे त्यांची नाराजी खेड-आळंदीची जागा देऊन राष्ट्रवादी (शरद पवार) दूर करते,का याकडे आता लक्ष लागले आहे.राजगुरुनगर (खेड) येथे शिवसेनेने कालच पत्रकारपरिषद घेऊन शिरुर लोकसभा मतदारसंघातील एक,तरी जागा देण्याची आग्रही मागणी केलली आहे.तसेच खा. कोल्हेंमुळे जागा न मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.