पिंपरी महापालिकेच्या लेखाधिकाऱ्याला रिटायर झाल्यावर एसीबीने दिला दणका;५६ लाखाची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल लाचखोरीचा गुन्हा केला दाखल

उत्तम कुटे
पिंपरीः पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नवा कॅप्टन (एसपी)मिळाल्यापासून चांगलाच अॅक्टिव्ह मोडवर आला आहे. लाच घेणाऱ्यांना पकडण्याबरोबरच गैर म्हणजे भ्रष्ट मार्गाने बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्यांनाही त्यांनी आपल्या रडारवर घेतले आहे.आज (ता.२५) त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे रिटाय़र्ड लेखाधिकारी (पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभाग) किशोर बाबूराव शिंगे यांना दणका दिला.ज्ञान उत्पन्नापेक्षा १०३ टक्के जास्त म्हणजे ५६ लाखाची मालमत्ता बाळगल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नऊ दिवसांपूर्वीच (ता.१६) पुणे एसीबीने एक कोटी ६८ लाख ७४ हजार ४४ रुपयांची बेहिशोबी संपत्ती (अपसंपदा) जमा केल्याबद्दल आणि बनावट बॉंड सादर करुन राज्य सरकारची फसवणूक केल्याबद्दल पुणे येथील झोपडपट्टी पुर्नवसन कार्यालयाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष रामचंद्र यादव व त्यांच्या पत्नी प्रतिक्षा यांच्याविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर आज त्यांनी दुसरी ही कारवाई केली.यातही त्यांनी शिंगे यांच्या पत्नी यांनाही सहआरोपी केले आहे.त्यांनी १९८७ ते २०१७ या तीस वर्षाच्या काळात जमा केलेल्या मालमत्तेबद्दल पटेल असे स्पष्टीकरण दिले नाही.म्हणून त्यांच्याविरुद्ध एसीबीच्या डीवायएसपी (पोलिस उपअधिक्षक) माधुरी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी शिंगे दांपत्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा आज दाखल केला.या विभागाचे डीवायएसपी दयानंद गावडे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *