चिंचवडमध्ये युतीत बंडखोरी,राष्ट्रवादीचे भोईर अपक्ष लढणार,२८ ला अर्जही भरणार..;यावेळीही चिंचवडला तिरंगी लढत? पुन्हा फायदा जगतापानांच होणार?

यावेळीही चिंचवडला तिरंगी लढत? पुन्हा फायदा जगतापानांच होणार?

उत्तम कुटे
पिंपरीःचिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीत भाजपचे शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.मात्र,आघाडीने ती अद्याप घोषित केलेली नाही.दरम्यान,तेथून अपक्ष लढण्याचा निर्णय युतीतील अजित पवार राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी घेतल्याने तेथे तिरंगी लढत होऊ घातली आहे.

गेल्या १५ वर्षात आमदारकीला डावललेल्या भोईरांनी १५ दिवसांपूर्वी निर्धार मेळावा घेऊन यावेळची विधानसभा लढण्याचा निर्धार केला.त्यावर गुरुवारी (ता.२४)त्यांनी आपल्या अत्यंत निकटच्या व विश्वासातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक घेऊन शिक्कामोर्तब केले.यावेळी त्यांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला.तसेच त्यांचा उमेदवारी अर्ज २८ तारखेला भरण्याचे निश्चीत करण्यात आले.छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अनंत कोऱ्हाळे, नाट्य परिषदेचे किरण येवलेकर, नवयुग साहित्य मंडळाचे राज अहेरराव, बाळासाहेब मरळ, विनोद मालू आदी यावेळी हजर होते.२०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराने कळस गाठला त्यामुळे विचलित होऊन २०२४ ची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला असल्याचे भोईरांनी यावेळी सांगितले.

दरम्यान,भोईरांमुळे चिंचवडची लढत यावेळी तेथील गेल्यावर्षीच्या पोटनिवडणुकीसारखीच तिरंगी होऊ घातली आहे.त्यावेळी शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटेंनी ४२ हजार मते घेतल्याने युतीच्या (भाजप)अश्विनी लक्ष्मण जगताप या ३६ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे नाना काटे यांना ९९ हजार मते मिळाली.यावेळी जगताप कुटुंबातील अश्विनी जगताप यांचे दीर आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगताप युतीकडून भाजपचे उमेदवार आहेत.त्यामुळे चिंचवडला आघाडी,युती,अपक्ष अशी पुन्हा तिरंगी लढत झाली,तर त्याचा फायदा पुन्हा जगतापांनाच होण्याची दाट शक्यता आहे.२००९ ला चिंचवडमधून भोईर पहिल्यांदा विधानसभा कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून लढले.त्यावेळीही तिरंगी लढतच झाली.त्यात अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप विजयी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *