युतीत भाजपनंतर शिवसेनेतही दिसली त्यांच्या उमेदवार यादीतून घराणेशाही
उत्तम कुटे
पिंपरीःविधानसभा निवडणूक १५ तारखेला जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांतच युतीतील भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून सर्वांवर आघाडी घेतली होती.त्यानंतर त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने काल (ता.२२) मध्यारात्रीच्या सुमारास आपले ४५ उमेदवार एक्स वर (पूर्वीचं ट्विटर) घोषित केले.आता युतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादीची प्रतिक्षा असून कधीही ती येऊ शकते.
दरम्यान,कालच मनसेने आपली ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.मात्र,युतीचा मुख्य प्रतिस्पर्धी व राज्यात सत्तांतर करु अशी घोषणा केलेल्या आघाडीतील तीन पक्षांची एकही यादी त्यांच्यातील जागावाटपाचा घोळ आणि इच्छूकांची मोठी राग यामुळे अद्याप जाहीरच झालेली नाही.वंचितने लोकसभेप्रमाणे आपले उमेदवार विधानसभेलाही रिंगणात उतरवले असून ते यावेळीही आघाडीलाच थोडा का होईना फटका देण्याची भीती आहे.दरम्यान, शिवसेनेच्या यादीत दोन सख्ये भाऊ (सामंत) आणि दोन आजी,माजी खासदारांची मुले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एक्स हॅंडलवर आपले उमेदवार जाहीर झाले.जेथे स्पर्धा नाही आणि त्यांचे आमदार आहेत त्या जागा त्यांनी घोषित केल्या असून त्यात त्यांचे अनेक मंत्री आहेत.दरम्यान,शिंदे यांच्या पहिल्या यादीत त्यांचे स्वताचे नाव पहिल्या नंबरवर आहे.ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मधूनच ते पुन्हा लढणार आहेत.ठाणे,मुंबई आणि कोकणातील अधिक नावे या यादीत आहेत.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघेहेबांच्याच्या आशीर्वादाने ही यादी जाहीर करीत असल्याचे या पोस्टमध्ये शिंदेंनी म्हटले आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातील खेडसारख्या राष्ट्रवादीच्या जागांवर दावा केलेल्या ठिकाणांचा उल्लेख शिवसेनेच्या या यादीत नाही.तसेच फक्त तीन महिलांना त्यात स्थान देण्यात आलेले आहे.भाजपच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.परवा रात्री खेड-शिवापूर टोलनाक्यावर पाच कोटीची रोकड एका मोटारीतून पकडण्यात आली.त्यानंतर पुन्हा चर्चेत आलेले काय झाडी, काय डोंगर…फेम शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यातून,आपल्या विधानांनी वरचेवर वाद ओढवून घेणारे आणि वादग्रस्त टेंडरमध्ये नाव आलेले आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना भूम,तर अब्दूल सत्तार यांना सिल्लोडमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.लोकसभेचे इच्छूक उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूर,तर किरण सावंत यांना रत्नागिरीतून तिकिट देण्यात आले आहे.लोकसभेला खासदार झालेले मंत्री संदीपान भुमरे यांचे पूत्र विलास भूमरे यांना पैठणमधून,तर माजी खासदार आनंदराव आडसूळ यांचा मुलगा अभिजीत याला दर्यापूरमधून संधी देत ठाकरेंवर घराणेशाहीचा आऱोप करणाऱ्या शिंदे शिवसेनेनेही ती आपल्याकडे सुरुच ठेवली आहे.लोकसभेला मुंबईत पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना पुन्हा भायखळ्यातून तिकिट दिले गेले आहे.

