पिंपरी-चिंचवडची पाटी कोरी,पण पुणे जिल्ह्यातून ११ उमेदवारांची दाखल केले अर्ज
उत्तम कुटे
पिंपरीःविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून (ता.२२) सुरुवात झाली.पहिल्या दिवशी राज्यातील २८८ जागांसाठी ५७ उमेदवारांचे ५८ अर्ज आले. त्यात पिंपरी-चिंचवडची पाटी कोरीच राहिली.पण,पुणे जिल्ह्यातून ११ जणांची उमेदवारी दाखल झाली.

राज्यात निवडणूक घोषित झाली त्या १५ तारखेपासून आचारसहिता लागली.तर,निवडणूक अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली.मंगळवारपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली. ते दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. ३० तारखेला अर्जांची छाननी होणार असून ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.२० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ तारखेला निकाल लागणार आहे.
सर्वाधिक पाच उमेदवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर (जि.नंदूरबार) आणि आंबेगाव (जि.पुणे) येथून प्रत्येकी चार,तर,पुणे जिल्ह्याच्या खेड-आळंदी मतदारसंघातून तीन अर्ज आले.आंबेगावातूनच कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाकडून अशोक काळे यांनी तो भरला आहे.पुणे जिल्ह्यातील शिरुर,इंदापूर,बारामती आणि वडगाव शेरीतून प्रत्येकी एकेक अर्ज पहिल्या दिवशी दाखल झाला.पिंपरी,चिंचवड आणि भोसरी अशा उद्योगनगरीतील तिन्ही जागांहून एकही तो आला नाही.
पिंपरी-चिंचवड शहरातून एकही उमेदवारी अर्ज आला नसला,तरी अनेकांनी तो नेला आहे. पिंपरीतून अजित पवार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे,आरपीआयच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे,ठाकरे शिवसेनेचे अॅड.गौतम चाबूकस्वार,शरद पवार राष्ट्रवादीचे देवेंद्र तायडे आदी २९ जणांनी ५९ अर्ज पहिल्या दिवशी नेले.चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप,ठाकरे शिवसेनेचे मोरेश्वर भोंडवे आदी १४ जणांनी ३५ उमेदवारी अर्ज नेले आहेत.

