समाजदूतांचे कार्य सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचावे :प्रा. डॉ.राजेंद्र कांकरीया

“समाज दूतांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे” अशी अपेक्षा प्रतिभा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व जेष्ठ साहित्यिक आणि अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ राजेंद्रजी कांकरीया यांनी व्यक्त केली.
निगडी येथील “सृजन प्रतिष्ठान” या संस्थेने आयोजित केलेल्या ‘समाज दूत’पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात डॉ कांकरिया अध्यक्ष म्हणून बोलत होते.या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आणि मावळ ऑनलाईन वेब पोर्टलचे संस्थापक विवेक इनामदार विशेष अतिथी तर बीना एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. आझम खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ कांकरिया यांनी वडीलांचे पुण्य स्मरण करण्याच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले .
हा कार्यक्रम आकुर्डी बीना इंग्लीश मिडीयम स्कूलच्या सभागृहात काल दि.१३ रोजी संपन्न झाला.निगडी येथील कवी, गजलकार आणि मुक्त पत्रकार श्री विवेक कुलकर्णी यांनी आपल्या वडिलांची स्मृती जपण्यासाठी स्थापन केलेल्या सृजन प्रतिष्ठानचे वतीने देण्यात येणाऱ्या ‘समाज दूत’ पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे.या वर्षी सामाजिक कार्यकर्ते व साप्ता.चाहूल चे संपादक डाॅ. सुरेश बेरी,ज्येष्ठ कवयत्री निवृत्त शिक्षिका शोभाताई जोशी,आणि ज्येष्ठ रंगकर्मी व कवी रमेश वाकनीस, तसेच निगडी येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ व आयएमए चे अध्यक्ष डॉ सुशील मुथीयान हे या पुरस्काराचे मानकरी ठरले.पुरस्कार स्विकारताना डाॅ.सुरेश बेरी म्हणाले,’ सृजन प्रतिष्ठानच्या विवेक कुलकर्णी यांचा फोन आला तेंव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.समाज ऋण फेडण्यासाठी साप्ता.चाहूलच्या माध्यमातून व प्रत्यक्ष चळवळीत काम करत राहिलो.पण आपल्या कार्याची दखल घेणारी संस्थाही पिंपरीचिंचवड मधे आहे हे आजच कळालं..’
सौ.शोभाताई जोशी यांनी शिक्षण सेवेतील आपले अनुभव सांगून श्रोत्यांना आनंद दिला व आभार व्यक्त केले.ज्येष्ठ रंगकर्मी व कवी रमेश वाकनीस म्हणाले,” विवेक कुलकर्णींचे वडील दिगंबरराव कुलकर्णी तथा दादा हे एक आनंद होतो आहे.तर काही वैयक्तिक कारणामुळे या सोहळ्यासाठी अनुपस्थित असलेल्या डॉ मुथीयान यांनीही फोन करून आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक कुलकर्णी यांनी आपल्या वडिलांच्या प्रती असलेले ऋण व्यक्त करत त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगत संस्थेच्या निर्मितीबद्दलचे मनोगत व्यक्त केले तर संस्थेचे सदस्य सुरेशजी कंक यांनी प्रास्ताविक केले.तर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असणाऱ्या विवेक इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
अतिशय हृदय वातावरणात पार पडलेल्या या कार्यकमात सविता इंगळे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले तर जेष्ठ साहित्यिक राज आहेरराव यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी शहरातले जेष्ठ साहित्यिक प्रा तुकाराम पाटील सर, राजेंद्रजी घावटे आत्माराम हारे,फुलवती जगताप, राधाबाई वाघमारे, सुरेश कंक, अरुणा वाकणीस, पिहू जोगळेकर, शुभांगी कामत, मुग्धा वाकणीस, मैथिली जोगळेकर, सुभाष चव्हाण,संजय बारी , राजू जाधव
माधुरी ओक
प्रा तुकाराम पाटील, रजनी अहेरराव प्रसन्न जोगळेकर
पी बी शिंदे, जयश्री श्रीखंडे
शरद काणेकर, आनंद मुलुक, सुहास घुमरे बाळासाहेब गस्ते
चंद्रशेखर जोशी
माधुरी विधाटे
राजेंद्र घावटे, अरविंद वाडकर
संगीता सलवाजी
विकास सूर्यवंशी, कैलास भैरट
अंतरा देशपांडे आदी उपस्थित होते
मा सुरेशजी कंक, राज अहेरराव आणि राजू जाधव यांनी हा सोहळा पार पडावा यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *