फुंकणार होते तुतारी,पण हाती घ्यावी लागली पेटती मशाल;आपला आवाज इम्पॅक्टः दुपारी बातमी आली,संध्याकाळी ती खरी झाली

आपला आवाज इम्पॅक्टः दुपारी बातमी आली,संध्याकाळी ती खरी झाली

उत्तम कुटे
पिंपरी आपला आवाजने शुक्रवारी (ता.१८)दुपारी अजितदादांना चिंचवडमध्ये धक्का,विश्वासू माजी नगरसेवक भोंडवे शिवसेनेत जाणार? या हेडिंगने बातमी दिली अन सायंकाळी लगेच ती खरी झाली.कारण भोंडवेंनी संध्याकाळीच मुंबईत मातोश्रीवर घड्याळ सोडून हाती पेटती मशाल घेतली.त्यांनी राज्यातील सत्ताधारी युतीतीलअजित पवार राष्ट्रवादीची सोडून विरोधी बाकावरील आघाडीतील ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला,हे विशेष.

विधानसभा निवडणूक परवा (ता.१६) जाहीर होताच राज्यात पक्षांतराला आणखी गती आली आहे.त्यातूनच आज सायंकाळी अजितदादा यांना चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला.त्यांचे विश्वासू माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी कार्यकर्त्यांसह पक्ष सोडला.युतीतून आघाडीत ते गेले. ठाकरे शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला.शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

भोंडवेंच्या प्रवेशाने चिंचवडमधील विधानसभेचे गणित बदलणार आहे.तेथे भाजप (युती) विरुद्ध राष्ट्रवादी (आघाडी) अशी होऊ घातलेली लढत आता भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी होण्याची दाट शक्यता आहे. कारण तिकिट मिळण्याच्या आश्वासनावरच भोंडवेंनी हातावरील घड्याळ काढून पेटती मशाल हातात घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यांच्यासह अजितदादांच्या चार नगरसेवकांनी गेल्या महिन्यात २५ तारखेला भाजपकडील चिंचवड पक्षाकडे घेऊन तेथे त्यांच्यापैकी उमेदवार देण्याची मागणी त्यांनी केली. नाही,तर तुतारी फुंकण्याचा इशारा दिला होता.तो त्यांनी खरा करून दाखवला.

दरम्यान,भोंडवेच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांचे काम करणार असल्याचे बंडाचा इशारा दिलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने आपला आवाजला सांगितले. त्यासाठी हातावरील घड्याळ काढणार का असे विचारले असता त्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ,असे हा माजी नगरसेवक म्हणाला.दरम्यान,त्यातून आघाडी तथा भोंडवेची बाजू मजबूत होणार आहे.युतीतील भाजपमधील जगताप विरोधक माजी नगरसेवक गटाकडूनही त्यांना रसद मिळण्याची शक्यता आहे.हे युतीतील दोन माजी नगरसेवकांचे नाराज गट एकत्र आले,तर भोंडवेंची बाजू आणखी मजबूत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *