अजितदादांना चिंचवडमध्ये धक्का,विश्वासू माजी नगरसेवक भोंडवे शिवसेनेत जाणार?
उत्तम कुटे
पिंपरीः विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सुरु झालेल्या इनकमिंग,आऊटगोईंगला आता तिची घोषणा झाल्यानंतर वेग आला आहे.उमेदवारी मिळणार नाही,असे लक्षात येताच एका पक्षातून दुसऱ्यात इच्छूक उड्या मारु लागले आहेत.त्यातून सायंकाळी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.त्यांचे विश्वासू माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे ठाकरे शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या वांद्रे,मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी सांयकाळी प्रवेश करणार आहेत.
भोंडवेंच्या प्रवेशाने चिंचवडमधील राजकीय समीकरण बदलणार आहे.तसेच त्यांच्या पेटती शाल हाती घेण्यातून चिंचवडची जागा ही आघाडीत राष्ट्रवादी नाही,तर शिवसेनेला सुटणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.त्यातून तेथे भाजप विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत होऊ घातली आहे.शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे भोंडवे यांनी स्वतच थोड्या वेळापूर्वी आपला आवाजला सांगितले.आपल्या कार्यकर्त्यांसह ते मातोश्रीकडे रवानाही झाले आहेत.आणखी काही माजी नगरसेवकही शिवसेनेत येतील,असा दावा त्यांनी केला आहे.
रावेत परिसरात भोंडवे हे एक मोठं प्रस्थ आहे.ते यापूर्वीही चिंचवडमधून लढलेले आहेत.ते मयूर कलाटे,प्रशांत शितोळे आणि विनोद नढे या दमदार अजित पवार राष्ट्रवादीच्या चार माजी नगरसेवकांनी गेल्या महिन्यात २५ तारखेला पत्रकारपरिषद घेऊन बंडाचे निशाण फडकावले.भाजपचा आमदार असलेला चिंचवड मतदारसंघ यावेळी पक्षाकडे घेऊन तेथे नवा चेहरा (आमच्यातील) देण्याची मागणी त्यांनी केली. नाही,तर आघाडीचे दरवाजे उघडे असल्याचा इशारा दिला होता.तो अशंत का होईना आता खरा होणार आहे.
पवारांनी चिंचवडवरचा दावा का सोडला
चिंचवड मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तेथे जगताप पती-पत्नी चारवेळा आमदार आहेत. या एकाच कुटुंबाचा तेथे वरचष्मा आहे.तेथे युतीविरुद्ध (भाजप) आघाडीकडे (शरद पवार राष्ट्रवादी)निवडून येईल असा उमेदवार नव्हता.दुसरीकडे भोसरी, पिंपरी या शहरातील इतर दोन जागा त्यांनी लढायचे नक्की केले.त्यामुळे चिंचवड हा त्यांना शिवसेनेला सोडणे भाग पडणार होते.त्याव्दारे आघाडीधर्म पाळत मित्रपक्षाला जागा दिली असे त्यांना म्हणताही येणार आहे.दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपमधीलही मोठ्या नाराज गटाची मदत मिळाली,तर आघाडीचा (शिवसेना) संभाव्य उमेदवार निवडून आणून अजितदादांच्या बालेकिल्याला खिंडार पा़डण्याचीही पवासाहेबांची व्यूहरचना असल्याचे बोलले जात आहे.