आधुनिक काळात बँक ग्राहकाची मार्गदर्शक व वित्तीय सल्लागार झाली पाहिजे – गिरीश जाखोटिया

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपाक): आधुनिक बँकिंगच्या पर्वात बँक ग्राहकाचा मार्गदर्शक, वित्तीय सल्लागार झाली पाहिजे. अनेक बँका आता ग्राहकांशी भागीदारीही करू लागल्या आहेत, असे प्रतिपादन वित्तीय सल्लागार व लेखक गिरीश जाखोटिया यांनी येथे केले.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या नारायणगाव, जुन्नर आणि आळेफाटा या शाखांचा सभासद व ग्राहक प्रशिक्षण मेळावा सोमवारी नारायणगाव येथे पार पडला. त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, लाला अर्बन बँकेचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, माऊली खंडागळे, अमित बेनके, प्रियांका शेळके, संतोष वाजगे, राजगुरुनगर बँकेचे संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, राहुल तांबे, सागर पाटोळे, दत्तात्रेय भेगडे, समीर आहेर, व्यवस्थापन मंडळ सदस्य दीपक वारुळे, ॲड. सुरेश कौदरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, सरव्यवस्थापक अमृत टाकळकर, उपसरव्यवस्थापक संजय ससाणे, सहायक सरव्यवस्थापक दिलीप मलघे, बाळासाहेब घोलप, सम्राट सुपेकर, व्यवस्थापक गायत्री बेरी, रामदास होले, काळूराम बोंबले, तनुजा साबळे आदी उपस्थित होते.
जाखोटिया म्हणाले, “नागरी बँकांनी आता पारंपरिक पद्धतीने व्यवसाय न करता नवीन पद्धती अवलंबिल्या पाहिजेत. बँकेत शेती, रिटेल व्यवसाय, वित्त, उद्योग, बांधकाम, सेवा उद्योग इत्यादी प्रत्येक प्रकारातील सखोल अभ्यास असलेली एकेक व्यक्ती पाहिजे. त्या व्यक्तीने ग्राहकांना त्यांच्या उद्योग व्यवसायात मार्गदर्शन केले पाहिजे.‌ कर्जाच्या रचनात्मक कर्ज, भागीदारीत कर्ज, गुंतवणूक कर्ज अशा नवीन पद्धती अवलंबिल्या पाहिजेत.”
ऑनलाईन बँकिंगमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रौढ लोकांनी हे धोके जाणून घेतले पाहिजेत. कुटुंबातील नवीन पिढीकडून तंत्र शिकून घेतले पाहिजे. बँकांमध्ये स्वयंचलितता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे ग्राहक बँकेत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरी नागरी सहकारी बँकांनी ग्राहक संपर्क तुटू देता कामा नये. ग्राहक संपर्क आणि ग्राहक सेवा ही नागरी सहकारी बँकांची खासियत आहे, असे जाखोटिया यांनी सांगितले.
आहे.
नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना जलद सेवेची अपेक्षा असते. बँकेमधील ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवेचा अनुभव देण्यासाठी ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानामध्ये राजगुरुनगर बँकेने मोठी गुंतवणूक केली आहे. त्याबरोबर बँकेच्या व ग्राहकांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँक काटेकोर नियम बनवत आहे.‌ ग्राहकांच्या अपेक्षा आणि रिझर्व्ह बँकेचे नियम पाळताना बँकेला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणून ग्राहकांनी बँकेला समजून घेतले पाहिजे. पाठिंबा आणि बळ दिले पाहिजे. शेवटी कितीही तंत्रज्ञान आणि नियम अटी आल्या तरी आपल्या एकमेकांच्या विश्वास आणि जिव्हाळ्यालाच अधिक महत्त्व असणार आहेत. काळ कितीही पुढे गेला तरी सचोटी, विश्वास, आपुलकी, माणुसकी, सहकार्य ही मूल्ये चिरंतन राहणार आहेत, असे यावेळी अध्यक्ष ओसवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले.
वाकचौरे यांनी प्रास्ताविक केले. सांडभोर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपक वारूळे यांनी संयोजन केले. अभय वारुळे यांनी सूत्रसंचालन केले.पाटोळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *