गुरुवारी संध्याकाळचे पाणी बंद,दुसऱ्या दिवशी कमी दाबाने

पिंपरीःगेल्या चार वर्षांपासून उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.त्यात देखभाल,दुरुस्तीसाठीअधूनमधून तो बंद ठेवण्यात येत असल्याने महिलावर्गाची आणखी कुचंबणा होते.येत्या गुरुवारीही (ता.१७) शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद मेंटेनन्सकरिता बंद ठेवला जाणार आहे.

शुक्रवारी (ता. १८) कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेचे मुख्य अभियंता (पाणीपुरवठा विभाग) प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ते काटकसरीने वापरावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर हाऊसचे इनलेट गेट बदलण्यात येणार असून सीएलएफ ड्रेनचा व्हॉल्व बदलणे,तो बसवणे यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.मात्र,गुरुवारी (ता.१७) सकाळी तो केला जाणार आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *