…आता प्रतिक्षा उमेदवार जाहीर होण्याची, इनकमिंग,आऊटगोईंगला येणार वेग

युती की आघाडी कोणाची दिवाळी गोड?कोणाच्या फटाक्याचा आवाज होणार?

उत्तम कुटे
पिंपरीः गेल्यावेळी २०१९ ला हरियाणा राज्याबरोबर महाराष्ट्राचीही विधानसभा निवडणूक झाली होती.यावेळी हरियाणाचा निकालही आला.त्यामुळे राज्यात हा बिगूल कधी वाजणार याची मोठी प्रतिक्षा होती.ती अखेर आज संपली.

राज्यातील नवरात्र,दसरा,दिवाळी हे सण,उत्सव संपल्यानंतरच ही निवडणूक होणार आहे. त्यातून प्रशासन व त्यातही पोलिसांवर ताण न येण्याची खबरदारी निवडणूक आयोगाने घेतली आहे.दरम्यान, आता राज्यात राजकीय धुरळा उडण्यास लगेचच सुरवात होईल.तो पुढील महिनाभर राहील.

आता युती व आघाडीलाही आपले रखडलेले जागावाटप उरकावे लागणार आहे.कारण त्यानंतरच टप्याटप्याने त्यांना उमेदवार जाहीर करता येणार आहेत. लोकसभेची निवडणूक कडक उन्हाळ्यात झाल्याने मतदान कमी झाले होते. मात्र,विधानसभेची ती थंडीची चाहूल लागताना होत असल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.तो वाढला,तर ती बाब युतीच्या पथ्यावर पडणारी असेल,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

यावेळी दिवाळीत फटाक्यांची डबल आतषबाजी होणार आहे.कारण राजकीय फटाकेही फुटणार आहेत. त्यात युती की आघाडी कोणाचा आवाज जनता ऐकणार व त्यातून कोणाचा आवाज मोठा निघणार हे,मात्र दिवाळी झाल्यानंतरचकळणार आहे. तसेच कोणाची दिवाळी गोड झाली तसेच दिवाळीअगोदरच बहिणींना ओवाळणी दिलेल्या भावांना बहिणींनी काय रिटर्न गिफ्ट दिले हे ही दिवाळीनंतर समजणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *