बिबट रेस्क्यू सेंटर मध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले बिबट्याचे सहजीवन
नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रामध्ये नुकताच वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. येथे विद्यार्थ्यांनी बिबट्याचे सहजीवन कसे असते याविषयीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील ज्ञानमंदिर हायस्कूल आळे कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक, श्री विघ्नहर विद्यालय ओझर ,न्यू इंग्लिश स्कूल हिवरे खुर्द या शाळांमधील १२० विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

अमोल सातपुते, उपवनसंरक्षक यांनी वन्यजीवांचे मानवीय जीवनातील महत्व अधोरेखित करत त्यांचे संवर्धन व संगोपन कसे महत्वाचे आहे हे पटवून देत मानव बिबट संघर्ष कसा निर्माण झाला व तो कसा कमी केला जाऊ शकतो याबाबत विद्यार्थांना प्रश्र्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस , डी. के. वळसे पाटील, ज्ञान शक्ती विकास वाहिनी संस्था, समीर हुंडारे यांनी आपल्या विचारांतून वन्यजीवांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
तर डॉ . महेंद्र ढोरे यांनी पॉवर पॉईंट प्रझेंटेंशनच्या माध्यमातून बिबट्याची जीवनशैली कशी असते याविषयी मार्गदर्शन केले. मुलांना बिबट्या बाबतची जीवनशैलीचे व त्यांची काळजी घेण्यासाठी बिबट निवारण केंद्रात का जपवणूक केली जाते हे समजावे म्हणून उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला . दरम्यान संजय भोईटे यांनी केलेले बीज संकलन व ५० पक्षाचे पंख संकलन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यावेळी जुन्नर विभागातील वन्यजीव समिती चे अधिकारी तसेच मानद वन्यजीव रक्षक धनंजय कोकणे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण , महेंद्र ढोरे, मनिष तळेकर, गावडेवाडी चे सरपंच विजय गावडे, नितीन विधाटे बिबट निवारण केंद्राचे अधिकारी कर्मचारी व वनपाल वनरक्षक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले तर आभार वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी मानले.

