पोलिस ठाण्यासमोर ठिय्या धरला, गुन्हा दाखल झाला तेव्हाच जमाव हटला
उत्तम कुटे
पिंपरीःवाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीतील एका मशिदीच्या आवारातील अवैध मदरशाचा भाग पिंपरी- चिंचवड महापालिकेने पाडल्यानंतर तेथे मोठा तणाव नुकताच पसरला होता.त्यानंतर तशीच काहीशी परिस्थिती शुक्रवारी (ता.४) रात्री थेट वाकड पोलिस ठाण्याच्या आवारातच तीन तास निर्माण झाली होती.तेथे ठिय़्या धरून बसलेल्या जमावाची मागणी मान्य झाल्यानंतरच तो पांगला.
यती नरसिंहानंद सरस्वती महाराज यांनी गाजियाबाद,उत्तरप्रदेश येथे जाहीर कार्यक्रमात गेल्या महिन्याच्या २९ तारखेला मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर आणि कुराण या मुस्लिम धर्म ग्रंथाविषयी नुकतेच आक्षेपार्ह वक्तव्य केले. येथून चौदाशे किलोमीटर दूर अंतरावर घडलेल्या या घटनेत बदनामीकारक विधान केल्याबद्दल नरसिंहानंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा,या मागणीसाठी मुस्लिम समाजाने काल रात्री नऊ वाजता वाकड पोलिस ठाण्य़ासमोर ठिय्या धरला.त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला.पण, ते बधले नाहीत.अखेर रात्री बारा वाजता एसीपी,डीसीपी आले.ते सीपी विनयकुमार चौबेंशी बोलले.त्यानंतर शांततेचा भंग करीत राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचविल्याप्रकरणी नरसिंहाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.त्यानंतरच जमाव हटला.

याबाबत सिद्दीक ईस्माईल शेख (वय ३७,रा.वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सरपणे समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्यासाठी नरसिंहानंद यांनी विधान केल्याने राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाल्याचे त्यात म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

