युतीचे माजी नगरसेवक भोसरीत आघाडीचे इच्छूक अजित गव्हाणेंच्या प्रचारात
उत्तम कुटे
पिंपरी-चिंचवडःऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गळती लागणार असून महाविकास आघाडीत (शरद पवार राष्ट्रवादीत) इनकमिंग होणार आहे.शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादीतील चार माजी नगरसेवकांनी तुतारी फुंकण्याचा इशारा दिला.त्यानंतर याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईऱ यांनीही नुकतेच (ता.२) बंड पुकारले.तर,आता शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपमधून शरद पवार राष्ट्रवादीत इनकमिंग होणार आहे.
निवडणूक आली की, राजकीय पक्षांत इनकमिंग,आऊटगोईंग जोरात सुरु होते.तसेच ते उद्योगनगरीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होऊ घातले आहे.पिंपरी पालिकेतील भाजपचे माजी क्रिडा सभापती तथा माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते (प्रभाग ३ ड,मोशी)दोन दिवसांत आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.त्यांनी स्वतच ही माहिती थोड्या वेळापूर्वी आपला आवाजला ही माहिती दिली.भोसरीसह पिंपरीतील काही माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत.तसे झाले,तर भाजपला मोठे खिंडार पडणार आहे.
शरद पवार गटाचे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सस्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.त्यांच्याअगोदर भोसरीतून (प्रभाग ६क)धावडेवस्ती गतवेळी २१०७ ला बिनविरोध निवडून आलेले भाजपचे रवी लांडगे यांनी २० ऑगस्टला ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.तर,त्यांच्यापूर्वी प्रियंका बारसे आणि वसंत बोराटे या भाजपच्याच माजी नगरसेवकांनी कमळ सोडून तुतारी हाती घेतलेली आहे.
दुसरीकडे शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात युतीतील अजित पवार राष्ट्रवादीत गळती होणार आहे.तेथील अजितदादांच्या अत्यंत विश्वासू अशा चार माजी नगरसेवकांनी तुतारी फुंकण्याचा इशारा दिला आहे.त्यानंतर तेथील त्यांचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी नुकतेच (ता.२)बंडाचे निशाण फडकावले.त्यामुळे तेथे अजित पवार राष्ट्रवादीला गळती लागून शरद पवार राष्ट्रवादीत इनकमिंग होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.विधानसभेची निवडणूक जाहीर होताच त्याला आणखी वेग येणार आहे.