चिंचवड मध्ये भाजपकडून अनेक इच्छूक,पण तिकिट पुन्हा जगतापांनाच?
चिंचवड मध्ये उमेदवारीचं युतीमध्ये ठरलं,आघाडीत,मात्र घोळात घोळ
उत्तम कुटे (संपादक आपला आवाज)
पिंपरी-चिंचवडःविधानसभा निवडणूक राज्यात येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांसह हौसे,नवसे,गवसेही तयारीला लागले आहेत.उद्योगनगरीत यावेळी
चिंचवड मतदारसंघात उमेदवारीचं महायुतीमध्ये जवळपास ठरलं आहे.मात्र,महाविकास आघाडीत त्यासाठी मोठी चुरस असल्याने घोळात घोळ आहे.दरम्यान,येथील लढत थेट न होता मागच्यासाखी बहूरंगी होण्याचे संकेत मिळाले आहेत.तसं झालं,तर महायुतीला पुन्हा त्याचा फायदा होईल,असा अंदाज आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी,चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चिंचवडमध्ये भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आहेत.जेथे ज्याचा आमदार ती जागा त्यांची असे सूत्र महायुतीत ठरलेले आहे.त्यामुळे चिंचवडची जागा ही भाजपकडेच राहणार फक्त उमेदवार पुन्हा जगतापच असणार का?कारण या मतदारसंघामधून भाजपचे शहराध्यक्ष असलेले आणि आमदार अश्विनी जगतापांचे दीर शंकर जगताप यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे.तसेच ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांतअण्णा नखाते आणि शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांचीही नावे येथे घेतली जात आहेत.नखाते यांनी,तर मतदारसंघ पिंजूनही काढला आहे.
ही जागा गतवेळी राष्ट्रवादीने लढविली होती.पण,त्यावेळी ती एकसंध होती. दुभंगल्यानंतर अजित पवार गट महायुतीत सामील झाला,तर शरद पवारांचा आघाडीत गेला.शरद पवार राष्ट्रवादी चिंचवड पुन्हा लढणार आहे.पण त्यांच्या उमेदवारीविषयी मोठी चुरस असल्याने तो कोण हे अद्याप निश्चीत झालेले नाही.तेथे त्यांच्याकडून पुन्हा नाना काटे इच्छूक आहेत.ते तेथे यापूर्वी दोनदा लढले आहेत.तर,तेथे तीनदा लढलेले राहूल कलाटे हे सुद्धा आघाडीकडूनच लढण्याच्या प्रयत्नात आहेत.मात्र,तेथून तिकिट नाही मिळाले,तर ते पुन्हा गेल्याप्रमाणे अपक्ष म्हणून रिंगणात उतरू शकतात,अशीही चर्चा जोरदार आहे.
अजित पवार राष्ट्रवादीतील ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही बंडाचे निशाण चिंचवडमध्ये फ़डकावले आहे. ते सुद्धा रिंगणात उतरू शकतात.तर,अजितदादांच्याच काही नाराज माजी नगरसेवकांच्या गटानेही नवा चेहरा (म्हणजे काटे,कलाटे सोडून त्यांच्या गटातील) उमेदवार म्हणून नाही दिला,तर तुतारी फुंकू,असा इशारा दिला आहे.त्यामुळे उमेदवार चिंचवडला येथे कोण द्यायचा हे आघाडीला (शरद पवार राषट्र्वादीला) निश्चीत करणे जिकीरीचे झाले आहे.
चिंचवड मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर तेथे २००९ ला झालेल्या पहिल्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप तथा भाऊ आमदार म्हणून निवडून आले.तेच पुन्हा २०१४ आणि २०१९ ला निवडून आले.आमदारकीची त्यांनी हॅटट्रिक केली.मात्र,त्यांचे गेल्यावर्षी अकाली निधन झाले. त्यानंतर तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी निवडून आल्या.अशाप्रकारे चिंचवडवर फक्त जगताप कुटुंबाचेच वर्चस्व राहिले.कारण त्यांना मानणारा मोठा मतदार तेथे असून त्यातही भाऊंचा मोठा करिष्मा आहे. त्याच्या जोरावरच पुन्हा जगताप कुटुंबातील सदस्य उमेदवार असेल,अशी दाट शक्यता आहे.त्यासाठी भाऊंचे लहान सख्खे भाऊ शंकर यांचे नाव चर्चेत आहे.त्यांनी तशी तयारीही जोरात सुरु केलेली आहे.भाऊंच्या निधनानंतर शंकर जगताप यांच्या गळ्यात भाजपच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी येऊन पडली. ती त्यांनी लीलया पार पाडली. गेल्या वर्षभरात नव्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत केली.यामुळे त्यांच्या नावावर भाजपक़डून चिंचवड विधानसभेचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब होऊ शकते,अशी चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करीत आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघ जगतापांचा बालेकिल्ला राहील की महाविकास आघाडी त्याला सुरुंग लावेल,याबाबत तुमच्या काय तिक्रिया आहेत,हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.धन्यवाद.