गणेशोत्सव घरा घरात महाराणा मना मनात उपक्रम
निगडी : राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर पुणे आयोजित “गणेशोत्सव घरा घरात महाराणा मना मनात” या उपक्रमाची सुरुवात श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती व श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची आरती शहरातील प्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर रामसिंग तोमर व त्यांचे लहान बंधू दत्तू सिंग रामसिंग तोमर यांच्या शुभहस्ते तसेच समस्त हिंदू समाज बांधव व संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप उद्यान निगडी येथे संपन्न झाली.यावेळी समाज बांधवांमध्ये अतिशय उत्साहाचं स्वतः ला गौरवास्पद वाटावं असं भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

हिंदुस्थानला इस्लामिक राष्ट्र होण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःचे संपुर्ण जीवन रानावनात घालवून मोघलांना शरण न जाता त्यांच्याशी वाघाप्रमाणे एकाकी झुंज देत सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेत फक्त हिंदू धर्म संस्कृती टिकून राहावी यासाठी पंच पक्वान्न व राजविलासास त्यागून आपल्या सवंगड्यांसह स्वाभिमानाने गवताच्या भाकरी खात अनेक लढाया लढल्या व जिंकल्या असे एकमेव हिंदू राष्ट्र संकल्पक हिंदूसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा शौर्य व पराक्रमाने ओतप्रोत भरलेला इतिहास आजच्या व उद्याच्या पिंढ्यापुढे जावून त्यांच्यात हिंदू धर्माची व देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचा मानस संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार सिंह बायस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले,राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड या संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार सिंह बायस,ॲड.डॉ.श्रीराम परदेशी,भावी उपाध्यक्ष राजकुमार परदेशी,भावी अध्यक्ष राणा अशोक सिंह इंगळे,भावी सचिव राणा गणेश सिंह विठ्ठल सिंह राजपूत,भावी सोशल मीडिया प्रमुख रवींद्र कच्छवे,राणा सागरसिंह बघेल,राणा गणेश राजपूत,राणा चतुर्भुज चव्हाण,रामेश्वर सोळंकी सह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.