महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी श्री.क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, म्हाडाचे अध्यक्ष मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मा.आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विकास रेपाळे, ठाणे महानगरपालिका स्थायी समितीचे मा.सभापती राम रेपाळे युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर उपस्थित होते.
आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, शिवसेना पुणे जिल्हा परिषद मा.गटनेते देविदास दरेकर, शिवसेना तालुका संघटक अशोक मोढवे, वासुदेव भालेराव, कल्याण हिंगे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, प्रविण कोकणे, सरपंच रविंद्र वळसे पाटील यांनी त्यांचे स्वागत करुण सन्मान केला.