देशपातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास प्रदान

नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड, नवी दिल्ली यांच्यावतीने दिला जाणारा हंगाम २०२२-२३ चा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार काल १० ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, उत्तर प्रदेशचे गन्नामंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, नॅशनल फेडेरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, गुजरात चे मा.सहकार मंत्री ईश्वरसिंह पटेल यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला.
           यावर प्रतिक्रिया देताना श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की आपल्या विघ्नहर साखर कारखान्याच्या बाबतीत मला कायम मार्गदर्शन करणारे जेष्ठ नेते, आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कारखान्याचे संस्थापक स्व.निवृत्तीशेठ शेरकर शेठबाबा व कारखान्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळी, मार्गदर्शक यांच्या विचारांना पुढे नेऊन कारखान्याची यशस्वी वाटचाल अशीच सुरु राहील तसेच यापुढच्या काळातही सभासद व शेतकरी बांधवांचे हित जोपासण्याचे काम सर्वश्री संचालक मंडळाच्या वतीने केले जाईल अशा भावना व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली तसेच हा पुरस्कार आमच्यावर विश्वास ठेवणारे सभासद, समस्त शेतकरी बांधव व शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन ठेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला समर्पित करतो असे म्हटले.
          यावेळी साखर उद्योगातील मान्यवर मंडळी, कारखान्याचे सर्वश्री संचालक मंडळ, युनियनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *