पिंपरी-चिंचवड शहर भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांचा मनोज जरांगे यांच्या रॅलीला विरोध

कसली शांतता ही तर माथी भडकवण्याची रॅली

पिंपरीः : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी मराठा जनजागृती व शांतता फेरी होणार आहे. पुणे शहरात सकाळी ११ वाजता फेरीला सुरुवात होईल. स्वारगेट येथील सारसबाग-बाजीराव रोड, आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन (अलका टॉकीज) या मार्गाने जाईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातून जरांगेंच्या या शांतता रॅलीवर टिका होऊ लागली आहे. तसेच या रॅलीला विरोधदेखील वाढू लागला आहे. भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी मनोज जरांगे यांच्या या शांतता रॅलीवर टिका केली आहे. कसली शांतता, ही तर माथी भडकविण्याची रॅली आहे. मनोज जरांगे हे एकतर्फे केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टिका करतात. खालच्या भाषेत फडणवीसांवर टीका करण्याचे काम जरांगे करत आहेत. त्यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर निषेध करणार असल्याचा इशारा देखील काळभोर यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमधून निघणारी फेरी निगडीतील भक्ती-शक्ती चौक या ठिकाणाहून सुरू होईल. यामध्ये देहूरोड, मावळ या भागातून येणारे मराठा बांधव भक्ती-शक्ती येथे सहभागी होतील. काळेवाडी, रहाटणी भागातील मराठा बांधव पिंपरी चौकात सहभागी होतील. खेड, जुन्नर व चाकण या भागातून येणारे बांधव नाशिक फाटा येथे सहभागी होतील. फेरी एकत्रितपणे भक्ती-शक्ती चौकातून सकाळी नऊ वाजता निघेल. ९.१५ वाजता पिंपरी चौकात आणि ९.३० वाजता नाशिकफाटा येथे पोहोचेल. त्यानंतर पुण्यातील सारसबागच्या दिशेने वाटचाल करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रतिक्रिया
मनोज जरागे पाटील ह्यांना निगडी भक्ती शक्ती उद्यान ह्या ठिकाणी रविवारी शांतता रॅली वेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या विरोधात जातीवादी टिका टिपणी तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे मनोज जरागे पाटील ह्यांना काळे झेंडे दाखवून पिंपरी चिंचवड शहरात विरोध करण्यात येणार आहे.

  • सचिन काळभोर,
    चिटणीस, भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *