येत्या १ ऑगस्ट २०२४ रोजी मातंग समाजाचे आराध्य दैवत लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती असुन, त्याच पार्श्वभूमीवर माजी ग्रह राज्यमंत्री असलेले व मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक रमेश बागवे यांचे खंदे समर्थक व शिरूर शहराध्यक्ष सतीश बागवे, यांनी संघटनेच्या लेटर हेड वर छापलेले निवेदन शिरूर चे तहसीलदार, शिरूर नगर परिषद तसेच शिरूर पोलीस स्टेशन ला दिले आहे. त्यात बागवे यांनी म्हटले आहे की, “साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी, सर्वत्र त्यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सोहळ्यात अबालवृद्धांसह, तरुण, तरुणी व महिलांचाही मोठ्या संख्येने समावेश असतो. परंतु काही समाज कंटक व विघ्न संतोषी लोक, अशा उत्सवात मद्य सेवन करून विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, १ ऑगस्ट रोजी (अण्णा भाऊ साठे जयंती) शिरूर शहरासह शिरूर तालुक्यातील मद्य विक्री दुकाने पूर्ण बंद असावीत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अन्यथा दुकाने उघडी आढळल्यास समाज आपल्या पद्धतीने दुकाने बंद करतील आणि यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील.”
अशा आशयाचे इशारा वजा निवेदन मातंग एकता आंदोलनाच्या वतीने दि. २९ जुलै २०२४ रोजी शिरूरच्या प्रशासनाला देण्यात आले आहे. निवेदन देताना सतीश बागवे, राजू जाधव, कैलास बागवे, काकासाहेब पाटोळे, गणेश खंदारे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विभागीय संपादक रवींद्र खुडे…