खिरेश्वर येथे वनविभागाच्या वतीने चेक पोस्ट ची उभारणी

वनसंपदेचे रक्षण तसेच सुरक्षित पर्यटनासाठी वन विभागाचा निर्णय

जून्नर तालुक्यातील खिरेश्वर तसेच किल्ले हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेली विविध पर्यटन स्थळे येथे पर्यटक निसर्गा अभ्यासक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर फिरायला व ट्रेकिंग साठी येत असतात यामुळे येथील वन विभागाच्या हद्दीमधील वनसंपदा सुरक्षित रहावी तसेच सुरक्षित व जबाबदार पर्यटन व्हावं आणि नैसर्गिक संपदेची हानी होऊ नये यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने खिरेश्वर येथे चेक पोस्ट उभारण्यात आले आहे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. याप्रसंगी स्थानिक वन हक्क समिती चे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, वनविभागाचे वनपाल आर.डि.गवांदे, वनरक्षक कोमल डाखोरे , वनरक्षक आर.के.फुलवड तसेच वन कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *