पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे प्रतिनिधी
दिनांक 8/7/2024
प्रादेशिक हवामान केंद्राने 9 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि 12वीपर्यंतच्या सर्व शाळा मंगळवारी बंद राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहे.
शाळांवर परिणाम करणारी आपत्कालीन परिस्थिती ..तथापि, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळेच्या कर्मचाऱ्यांनी, स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी कार्यालयीन वेळेत शाळेत जाणे आवश्यक आहे.
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, धबधब्यातील पर्यटन उपक्रम टाळावेत आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
