तळेगाव ढमढेरे येथील गुजर प्रशालेत योग दिन उत्साहात साजरा

तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचीन काळापासून महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या योग साधनेचे महत्त्व संपूर्ण जगाला मान्य झाल्यामुळे सण 2015 पासून संपूर्ण जगभर हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
याप्रसंगी प्रशालेच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिकांना सुरुवात करण्यात आली. यासाठी प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्याने योग साधना करण्यासाठी घरून स्वतःची वैयक्तिक साहित्य आणले होते.


प्रशालेचे माजी पर्यवेक्षक श्री प्रभाकर मुसळे तसेच प्रशालेचे उपशिक्षक राजेंद्र भगत व नंदा सातपुते त्याचप्रमाणे पतंजली योग समितीचे अध्यक्ष अंकुशराव घारे व सूर्यकांत वाघोले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच या योगसाधनेच्या आधी प्रजापिता ब्रह्मकुमारी अर्चना यांनी विद्यार्थ्यांना राजयोग शिकवला त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मन किती महत्त्वाचे असते हेही त्यांनी पटवून दिले. त्याचप्रमाणे प्रभाकर मुसळे सर यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगसाधनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व माणसाच्या मनाची मशागत करावयाची असेल तर आधी शरीर सुदृढ असायला हवं आणि शरीर सुदृढ हवं असल्यास त्यासाठी योग साधना व व्यायाम याला कुठलाच पर्याय नाही असेही मुसळे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जवळपास एक तास चाललेल्या या योगसाधनेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती व्यायामाद्वारे विद्यार्थ्यांनी योग साधनेतून रेखाटल्या. योग दिनाच्या निमित्ताने प्रशालेत वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व निबंध लेखन ही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहितीचे सखोल असे ज्ञान देण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रत्येक स्पर्धेचा आनंद लुटला.
या कार्यक्रमासाठी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्याक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या जागतिक योग दिनाच्या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे या संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर ,मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे ,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *