राजपूत समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘हिंदू कुलसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह राज्यस्तरीय पर्यावरण समाभूषण पुरस्कार’ मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. संघर्षातून मिळवलेल्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज नरवडे, माजी सरपंच धोंडूसाहेब मोरे, पौर्णिमा परदेशी, विशाल धनवडे, मेजर ईश्वर इंगळे, छाया बैस चंदेल, अतुल परदेशी, शिशुपालसिंह तोमर, देवानंद गहिले, शैलेंद्रसिंह राजपूत, हेमंत चौधरी, श्यामसिंह राजपूत, सुरजसिंह चव्हाण, प्रिया परदेशी, जीवनसिंह राजपूत, राजू भुजबळ, ऍड. अंबिका परदेशी, संदीप शिंदे, वैशाली जाधव, विजय वसवे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माजी महापौर मधुकर पवळे, जयसिंह राजपूत, प्रतापसिंह परदेशी, सय्यद अहफाजोद्दीन सय्यद गयासोद्दीन यांचा ‘मरणोत्तर समाजभूषण पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना अरुण पवार म्हणाले, की भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंह यांचे नाव साहस, शौर्य, त्याग आणि बलिदान यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहे. इतिहासातील त्यांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार ही अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारातून आपल्याला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच या पुरस्कारामुळे आपली समाजाप्रती काम करण्याची जबाबदारी वाढली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चिलवंत व सुरेश तळेकर यांनी केले. प्रास्ताविक शिवकुमारसिंह बायस यांनी, तर आभार दिनेश पाटील यांनी मानले.
आळंदीत इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण ; नदी फेसाळली
आळंदीत इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण ; नदी फेसाळली आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे…