अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या हस्ते पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांचा सन्मान

नारायणगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, वृक्षारोपण, बिबट जेरबंद मोहीम आदीसह वारूळवाडी व नारायणगाव परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांना नेहमीच मदत करणारे वारुळवाडी गावचे पोलिस पाटील, आपदा मित्र सुशांत भुजबळ व ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, शंतनू डेरे, नीलेश निंबाळकर यांचा नारायणगाव (ता. जुन्नर) येथे पुणे जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांच्यासह ग्रामसुरक्षा दलाचे जवान नेहमीच वारूळवाडी व नारायणगाव परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीला धावून जातात. पोलीस स्थानकाशी संबंधित कोणतीही विशेष घटना घडल्यानंतर ग्रामस्थ भुजबळ यांच्याशी संपर्क साधणे. त्यानंतर संबंधित विभागाला फोन करून माहिती देणे, बिबट जेरबंद मोहिमेत पिंजरा लावणे , पिंजरा वाहतूक करणे, बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याची रवानगी माणिकडोह येथील निवारा केंद्रात करणे. या कामात त्यांची वनविभागाला मोठी मदत होते. नारायणगाव परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भुजबळ यांच्यासह ग्रामसुरक्षा दलाचे जवान यांचे योगदान पाहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक चोपडे यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस कर्मचारी मंगेश लोखंडे यांचाही विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चोपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *