जुन्नर वनविभागामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्यप्राणी पूर्वसूचना यंत्र कार्यान्वित

वोरी साईनगर (तालुका जुन्नर) येथे जुन्नर वनविभागामार्फत दि. १८/०६/२०२४ पासून कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित वन्यप्राणी पूर्वसूचना यंत्र (Al base wild animal detection alarm system) बसवण्यात आले आहे.


या यंत्रणेमुळे आजूबाजूच्या परिसरात बिबट वन्यप्राणी दिसून आल्यास वनाधिकारी व रेस्क्यू मेंबर यांना संदेश पाठवला जातो तसेच या यंत्रणेवर लावलेल्या हुटर चा आवाज होतो व त्यामुळे सदर परिसरातील लोकांना आवाज गेल्याने ते सावध होतात यासोबतच वनाधिकारी यांना पोहचलेल्या संदेशामुळे त्या परीसरात जन जागृती साठी व बिबट रेस्क्यू साठी टीम पाठवली जाऊ शकते.
दरम्यान वनविभागाने या यंत्रणेचे काम सुरु केले असून त्यामुळे सदर परीसरातील लोकांना विबट असल्याची आगाऊ माहिती मिळण्यास मदत होत आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *