लोक वस्ती जवळ आढळला ९ फुटी अजगर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कडून जीवदान

वडगाव मावळ येथील डोंगर वस्ती मध्ये आढळला ९ फुटी अजगर. साप दिसल्यावर लगेच युवराज भोसले यांनी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे सभसद जिगर सोलंकी यांना दिली. अजगर लोक वस्ती च्या जवळ असल्या मुळे जिगर सोलंकी आणि रोहित पवार हे लगेच डोंगर चढून डोंगर वाडी येथे वरती गेले. तिथे साप राहीला तर तो आजगर होता तो गाईच्या गोठ्या जवळ असल्या कारणा मुळे त्या अजगराला सुरक्षित रेस्ककु केले. जिगर सोलंकी यांनी अजगराची तपासणी केली आणि अजगर स्वस्थ असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश संपतराव गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना पन याची माहिती दिली.

अजगरा बद्द्ल माहिती तिथे स्थानीक लोकांना सांगीतले, आणि स्थानिकांनी वचन दिले की ते कोणते ही साप मारणार नाही आणि  घरा जवळ साप किंवा कोणता वन्यप्राणी आढळल्यास वनविभाग किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थे ला सांगु असे युवराज भोसले, प्रतीक नवघने, तुषार नवघने, सौरभ भोसले, कुणाल नवघने, तुकाराम नवघने, नारायण भोसले, अशोक भोसले तसेच सर्व ग्रामस्थनी मिळून आश्वासन दिले.
इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) हा एक बिनविषारी जाती चा साप आहे. हा साप १५-१७ फुटा पर्यंत वाढू शकतो. मावळात आता पर्यंत १५ फुटचा अजगर आढळून आला आहे. वनविभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे च्या मदतीने या सापांना सुरक्षित रीतीत जंगलात सोडण्यात आले आहेत.

अजगर सापचे खाद्य छोटे भेकर, ससे, घुस व इतर प्राणी खातो. वडगाव मावळ पहिल्यांदा अजगर साप आढळून आला आहे.
कोणता ही वन्य प्राणी जखमी आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा जवळच्या प्राणीमित्र ला लगेच कळवा.
वन्यजीव अभ्यासक
जिगर सोळंकी

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अधळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *