ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी अन्नत्याग उपोषणास मानवी हक्क संरक्षण जागृतीचा जाहीर पाठिंबा.

पिंपळ गुरव येथे साहित्यिक सुरेश कंक यांनी त्यांच्या राहत्या घरी 119 वर्ष परंपरा असलेल्या परराज्यात पण विस्तार असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपळे गुरव सांगवी शाखा व्हावी म्हणून साडेचार वर्ष संस्थेला पत्र व्यवहार करत आहेत. मसापची भोसरी, निगडी येथे शाखा आहे तिसरी शाखा पिंपळे गुरव सांगवी येथे व्हावी म्हणून ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अन्नत्याग उपोषण करत आहेत. साहित्य जगले पाहिजे ,आणि तरुणाई साहित्येकडे आले पाहिजे यासाठी अधिकाधिक शाखा विस्तार करून प्रचार व प्रसार करण्यासाठी ते नेहमीच साहित्य संमेलने घेत असतात . राष्ट्रगीत म्हणून आणि दिवंगत साहित्यिकांना अभिवादन करून त्यांनी अन्नत्याग उपोषण चालू केले आहे.पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी ,पिपळे सौदागर  इतर उपनगराची लोकसंख्या जवळपास 15 लाखाच्या जवळपास आहे आणि 200 पेक्षा जास्त साहित्यिक, कवी, लेखक, प्रकाशक या परिसरात राहत आहेत. अनेक वर्ष महाराष्ट्रातील साहित्यिक ,नागरिक,मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून झगडत आहेत त्याच धर्तीवर हा साहित्यिक आलिविया शाखा मिळावी म्हणून झगडत आहे परंतु मसापच्या कोणत्याही शाखेने अथवा मुख्यालयाने संपर्क साधला नाही हे दुर्दैव आहे .मसापने त्यांच्या ध्येय धोरणाप्रमाणे शाखा दिली पाहिजे आणि साहित्य रुजणाऱ्या आपल्या वाढदिवसा दिवशी अन्नत्याग करायला लागणे हे साहित्य क्षेत्राचे निश्चित धोकादायक आणि क्लेशदायक  आहे असे  मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी जाहीर पाठिंबा देताना म्हटले आहे.

शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, नागरी समस्यांचा वेध घेण्यासाठी हे उपोषण  आहे. साहित्य  क्षेत्रासाठी मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आणि शाखा मिळावी म्हणून उपोषण होणे हे फारच दुर्दैवी आहे.आम्ही सर्व संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या पाठिशी आहोत
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले की, वाचन संस्कृती बंद होत चालली आहे, कवी, साहित्यिक वाढले पाहिजेत साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी सुरेश कंक सारखा ज्येष्ठ साहित्यिक यांचा मसापने सत्कार करून शाखा दिली पाहिजे असं मत व्यक्त केले
नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज आहेरराव म्हणाले ” मराठी भाषा जगवली पाहिजे, साहित्याच्या प्रचार आणि प्रसार होईल. मराठी भाषा रुजवण्यासाठी कंक सारखा साहित्यिक शाखा मागत असेल तर त्यांची मागणी रास्त आहे. यामुळे साहित्य सेवाच होणार आहे असे ते म्हणाले.
कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले  म्हणाले ” सर्व साहित्यिकांना एका धाग्यात गुंफण्याचे कंक नेहमी काम करतात. बाबा आमटे यांच्या भारत जोडो यात्रेत ते सहभागी होते.,अण्णा हजारे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.  सुरेश कंक गांधीगिरी पद्धतीने अन्नत्याग उपोषण करत आहेत याचा विचार मसापने निश्चितच करावा असे मला वाटते.
वसुंधरा पर्यावरण समितीचे अध्यक्ष तानाजी एकोंडे  म्हणाले.. महाराष्ट्र साहित्य परिषदेची   शाखा मिळाली तर मी अध्यक्ष राहणार  नसून दुसरे साहित्यिक अध्यक्ष असतील असे निस्वार्थीपणे बोलणाऱ्या आणि काम करणाऱ्या साहित्यिकांचा मोठेपणाचा विचार करून मसापने शाखा द्यावी असे मला वाटते.
यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, शहराध्यक्ष मीना करंजवणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सचिव गजानन धाराशिवकर सह नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज आहेरराव, पिंपरी चिंचवड मंचचे अध्यक्ष राजेंद्र घावटे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्ष मित्र अरुण पवार, पुणे जिल्हा विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे ,ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत तुकाराम पाटील, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, वसुंधरा पर्यावरण समितीचे अध्यक्ष तानाजी एकोंडे ,सरदार वल्लभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील ,प्रकाश वीर, कवी भाऊसाहेब गायकवाड, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, शंकर नाणेकर ,सोमनाथ कोरे ,शामराव सरकाळे, प्रकाश बंडेवार, जालिंदर दाते  राहुल शेंडगे,  सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *