नारायणगावचे गुरुवर्य सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय उत्तर पुणे जिल्ह्यात अव्वल…

नारायणगावचे गुरुवर्य सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय उत्तर पुणे जिल्ह्यात अव्वल

ज्ञानेश्वरी वर्पे हिचा ९२ % गुण मिळवून प्रथम क्रमांक

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
इयत्ता १२ वी चा आज २१ मे रोजी निकाल जाहीर झाला. यामध्ये ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव हे उत्तर पुणे जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. यावर्षीही महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल लागला असून कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक शाखांतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशावर आपले नाव कोरले आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे बोर्ड परीक्षेत एकूण ८८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कनिष्ठ महाविद्यालयाचा शेकडा निकाल ९५.५८ टक्के लागला.
विज्ञान शाखा ९९.१४%, वाणिज्य शाखा ९६.७६%, कला शाखा ७६.८५%, व व्यावसायिक विभाग ८४.४४ % निकाल लागला.
विज्ञान विभागामध्ये प्रथम क्रमांक कु. वर्पे ज्ञानेश्वरी योगेश ९२.०० %, द्वितीय क्रमांक यहळे प्रणव काळूराम ८९.६७ %, तृतीय क्रमांक कु. बटवाल सानिका शामराव ८९.००%, वाणिज्य विभागामध्ये प्रथम क्रमांक चव्हाण प्रज्वल संदीप ९३.८३%, द्वितीय क्रमांक कु. मुथ्था पलक निर्मल ९३.३३%, तृतीय क्रमांक भुजबळ श्रेयस भागेश्वर ९१.३३%, कला विभागामध्ये कु. क्षीरसागर मोनिका सूर्यकांत ७८.५०%, द्वितीय क्रमांक दुधाणे सुजित शेखर ७८.३३%, तृतीय क्रमांक काळे तन्मय रामदास ७५.३३ % तसेच व्यावसायिक विभागामध्ये कु. डिसोजा रोजी जॉन ६९.३३% द्वितीय क्रमांक पाबळे गिरीश नितीन ६८.८३%, तृतीय क्रमांक कु. गायकवाड दीपाली कैलास ६७.५०% मिळवला.
या निकालाची उल्लेखनीय बाब म्हणजे विज्ञान शाखेत ४३ विद्यार्थी विशेष प्राविण्याने व १७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच कु. बटवाल सानिका शामराव, कु. डोंगरे पायल दीपक या विद्यार्थिनींनी माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले व ढोले आर्यन अमोल या विद्यार्थ्यांने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. त्याचबरोबर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान या विषयांत ८ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९९ गुण मिळवले.
सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष प्रकाशमामा पाटे, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सर्व संचालक मंडळ, विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सतीशसिंह तंवर, उपप्राचार्य हनुमंत काळे, पर्यवेक्षक संजय वलटे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *