पिंपरी चिंचवड । स्थायी समिती सभेत विविध विकास कामांच्या खर्चांना तसेच विषयांना मान्यता देण्यात आली

प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत विविध विकास कामांच्या खर्चांना तसेच विषयांना आज मान्यता देण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, विविध योजना नागरिकांना पर्यंत पोहचवणे या अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे इतर आवश्यक विविध कामांसाठी येणाऱ्या खर्चासही प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत आज मान्यता देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
चिंचवड येथील जागा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांसाठी ट्रांझीट कॅम्प करिता तात्पुरत्या स्वरूपात भाडे तत्वावर देण्यास मान्यता देण्यात आली. मौजे चऱ्होली येथील मंजूर विकास योजनेचे आरक्षण क्र. २/६२ गुरांचा पाणवठाचे भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली.
मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये डांबरीकरणची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्रमांक १९ मधील हिंदू स्मशानभूमी मध्ये स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्रमांक १४ संत तुकाराम व्यापार संकुल आकुर्डी येथील इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. पवना नदीवर मौजे शिवणे तसेच मावळ तालुक्यातील मौजे गहूंजे येथील प्रगती पथावर असलेल्या कोल्हापूर पद्धतीने बंधारा बांधण्याच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *