नारायणगाव : पर्यावरण प्रेमीच्या, वडिलांच्या दशक्रीया विधी कार्यक्रमात मित्र मंडळींनी वाटली ५०० केशर रोपे.

अंधत्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थीनीचा शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पर्यावरण प्रेमीने आपल्या वडिलांच्या निधना नंतर त्यांच्या दहाव्याच्या दिवशी कुटुंबाने आणि मित्र मंडळींनी वृक्षचळवळीचा अनोखा संदेश संदेश दिलाय. येथील ७४ वर्षीय वय असलेले नारायणगाव येथील ज्येष्ठ नागरिक बाजीराव नारायण माताडे यांचे नुकतेच निधन झाले. येथील मीना नदी तीरावर त्यांच्या दशक्रियेच्या प्रित्यर्थ कुटुंबीय आणि बाबांचा मुलगा धनंजय माताडे यांनी यावेळी ५०० केशर आंब्याची रोपे वाटप करण्याचा अनोखा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे व लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांनी केले.
बाबांचा मुलगा धनंजय माताडे शिवजन्मभूमी फाउंडेशनचे नारायणगाव ,ओम साई सेवा मंडळाचे खजिनदार व सायकल वारी गृपचे संस्थापक अध्यक्ष असून ते दरवर्षी शिर्डी सायकल वारीचे आयोजन करून लेक वाचवा,पर्यावरण वाचवा असे सामाजिक संदेश देत असतात.
याच माध्यमातून सर्व मित्र मंडळी व ग्रुपच्या वतीने बाबांच्या दहाव्याला केशर आंब्याची रोपे वाटप करण्याचा निर्णय घेतला. आणि उपस्थित सर्व नातेवाईक आणि पाहुण्यांना केशर आंब्याची रोपे वाटप करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.या निमित्त हभप सुरेखाताई शिंदे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. वृक्ष वाटपामुळे प्रवचनकार हभप शिंदे भारावून गेल्या. त्यांनी प्रवचनाचे मिळणारे मानधन या वृक्ष वाटपाच्या उपक्रमास दिल्याबद्दल राजश्री बोरकर, माऊली खंडागळे व दीपक वारुळे यांनी त्यांचे आभार मानले.
काही वर्षापूर्वी नारायणगाव येथील मेहेत्रे कुटुंबियांनी मुलीच्या लग्नात सर्व वऱ्हाडी मंडळींना केशर आंब्याची रोपे वाटप केली होती.त्याची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन के बात मध्ये घेतली होती.आज दहाव्याच्या निमित्ताने पुन्हा नारायणगाव करांच्या या पर्यावरण प्रेमाची उपस्थितांनी दखल घेतली असच चित्र पाहायला मिळालं.

अंधत्वावर मात करून बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवलेल्या मुलीचा शैक्षणिक साहित्य देण्याचाही निर्णय.

ग्रामीण भागात दहाव्याच्या निमित्त गावातील मंदिराना देणगी देण्याची प्रथा आहे.अस असताना माताडे कुटुंबीय आणि मित्र मंडळी यांनी उपस्थित नागरिकांना आंब्याची रोपे वाटपा बरोबर अजून एक निर्णय घेतला,तो असा की, घरची नाजूक आर्थिक परिस्थिती असलेल्या व जन्मताच ९५ टक्के अंध असूनही अंधत्वावर मात करून १२ वी विज्ञान शाखेत ७०.५० टक्के गुण मिळवलेल्या आरती नरवडे या विद्यार्थिनीचा पुढील शिक्षणाचा शालेय साहित्य देण्याचा निर्णय सुद्धा यावेळी धनंजय बाजीराव माताडे यांनी जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *