आंबेगाव तालुक्यात क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप

आंबेगाव ब्युरो चिफ
मोसीन काठेवाडी


प्रधानमंत्री टी.बी मुफ्त भारत अभियनाअंतर्गत समुदाय आरोग्य संशोधन युनिट, के. ई. एम. हॉस्पीटल रिसर्च सेंटरने आंबेगाव तालुक्यातील ८० क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहाराचे वाटप केले. या पोषण आहारामध्ये गहू, डाळ, खाद्यतेल, शेंगदाणे इत्यादी चा समावेश आहे. सदर कार्यक्रम हा उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे पार पडला. सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये 300 क्षयरोग रुग्णांची नोंद आहे. या क्षयरोग बाधित रुग्णांना पोषक आहार मिळावा यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जास्तीत जास्त क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन क्षयरोग उच्चाटना करीता मदत करावी असे आवाहन कार्यक्रमादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार यांनी केले.
यावेळी मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. शिवाजी जाधव, सिनियर ट्रिटमेंट सुपरवायझर सुषमा भागवत, सिनीयर प्रयोगशाला सुपरवायझर संतोष बोऱ्हाडे, के. ई. एम.हॉस्पीटल रिसर्च सेंटरचे डॉ. गिरीष दायमा, डॉ. मकरंद घोरपडे, काजल तोंडे, डॉ.कांचन शिंदे आणि उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *