पुणे | दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एका तरुणाचा दगडाने ठेचून खून

पुणे : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय -३८, रा. -राजीव गांधी नगर , बिबबेवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पारेकर व त्याचे दोन साथीदार (राहणार -बिबबेवाडी ,पुणे) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता असून त्यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन दोन आठवड्यापूर्वी त्याने सुनील पारेकर यांच्या घरासमोर शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सुनील पारेकर यांनी श्रीकांत जाधव यास दारू पिऊन या ठिकाणी शिवीगाळ करू नको, असे सांगितले त्यावरून त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी रात्री श्रीकांत जाधव दारू पिऊन बिबेवाडीतील डॉल्फिन चौकाजवळील हर्ष टेलर दुकानासमोर थांबलेला असताना, त्याचे सुनील पारेकरशी पुन्हा वाद झाला. त्यावेळी सुनील पारेकर व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून श्रीकांत जाधव यास दगडाने ठेचून बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत जाधव यास पोलिसांनी भारती हॉस्पिटल याठिकाणी उपचारासाठी दाखल केले. मात्र ,गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *