शिवसेना भोसरी विधानसभा पदाधिकारी बैठक संपन्न

पिंपरी चिंचवड शहर शिवसेना भोसरी विधानसभा मुख्य पदाधिकारी महत्वाची बैठक दिनांक २७ मार्च २०२३ रोजी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडली.   यावेळी जिल्हा प्रमुख  भगवानशेठ  पोखरकर, उपजिल्हा प्रमुख संभाजीराव शिरसाठ, युवा जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव, महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे यांनी भोसरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन  केले.        भोसरी विधानसभा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर म्हणाले कि, राज्यात शिवसेना भाजपाचे युतीचे  सरकार असून मुख्यंमत्री हे आपल्याच शिवसेना पक्षाचे  एकनाथ शिंदे साहेब आहेत, समाज हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत, समाजाप्रती स्वतःला झोकून देणारे मुख्यंमत्री आपल्याला लाभलेत, त्यांच्या प्रमाणेच पदाधिकाऱ्यांनी देखील लोकांचे प्रश्न अडचणी सोडविल्या पाहिजे, पूर्वी पक्ष प्रमुखांना भेटण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे, आमदार खासदारांना देखील भेटी दिल्या जात नव्हत्या परंतु आता परिस्थिती तशी राहिली नाही, मुख्यमत्र्यांचे काही सुरक्षेचे प्रोटोकॉल असले तरी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना देखील मुख्यत्र्यांना भेटता येते एव्हढी मोकळीक या सरकार आणि शिवसेना पक्षात आहे,  यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले शिवसेनेत शाखा प्रमुखाला किती आणि कसे महत्व असते त्या पदाची गरिमा, त्या पदाच्या व्यक्तीचे काम कसे असते, विभाग प्रमुख, संघटन, तसेच वेगवेगळ्या आघाडी सेल यांचे संघटन कसे झाले पाहिजे अशा विविध मुद्यावर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *