शहरात H3N2 चा पहिला बळी ; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी बोलवली तातडीची बैठक

पिंपरी । प्रतिनिधी


H3N2 चा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांचे नियोजन

 

राज्यात H3N2 च्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पाहिला बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याची बैठक नियोजित केली असून, संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे…

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 चा पहिला बळी गेला आहे. ७३ वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे…
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन…
गेल्या काही दिवसांपासून एका वृद्ध व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संबंधित रुग्णाला सर्दी, खोकल्याची लक्षणं असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पिंपरी-चिंचवड ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या शून्य रुग्ण आहे अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *