चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत जगताप विरुद्ध कलाटे सरळ सरळ लढत की बंडखोरी होणार ?

रोहित खर्गे
विभागीय संपादक

 

चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून डायरेक्ट दिल्लीवरूनच आज शनिवारी (दि ४ फेब्रु) उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.भाजपाने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेशोत्सवातील कार्यकर्ते हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नाना काटे तर जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या नावांचा विचार केला जात आहे. त्यात राहुल कलाटे यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे असे समजते.भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या रूपाने महिला उमेदवार मैदानात उतरविल्या आहेत महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही .या अगोदर राहुल कलाटे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यात सव्वा लाखाच्या वर मते मिळवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचा आग्रह आपल्या पक्षातीलच कोणताही उमेदवार असावा असे खाजगीत बोलले जाते.
त्यामुळे जर राहुल कलाटे यांचे नाव निश्चित झाले तर बंडखोरी होण्याची शक्यता असल्याचे जाणकार सांगतात.भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी समोरासमोर उमेदवार असतील तर नक्कीच ही पोटनिवडणूक काटे की टक्कर होणार यात शंकाच नाही .पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांचा शब्द शक्यतो कोण्ही टाळत नाही पण राष्ट्रवादी चा उमेदवार नसल्याने अगोदरच नामनिर्देशन पत्र आणलेले पक्षातील नाना काटे तसेच जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची समजूत काढणार का की यातील एखादा नेता बंडखोरी करणार ? याकडे पिंपरी चिंचवडकारांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *