श्री क्षेत्र ओझर ता. जुन्नर येथे हॅपिनेस प्रोग्राम चा लाजवाब समारोप

मंगेश शेळके – ओझर प्रतिनिधी

श्री क्षेत्र विघ्नहर देवस्थान ओझर, आयोजित आनंद अनुभूती शिबिर अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाले.प.पूज्य श्री श्री रविशंकर जी गुरुदेव यांचे कृपाशीर्वादाने भक्ती की लहर या उपक्रमांतर्गत हॅप्पीनेस प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान योगा, प्राणायाम, ध्यान, पाच सूत्र त्याबरोबरच उपस्थित सर्व साधकांनी , गुरुदेवांनी संपूर्ण जगाला दिलेली एक देणगी म्हणजे सुदर्शन क्रिया. या सुदर्शन क्रियेचा सर्वांनीच एक विलक्षण विस्मरणीय अनुभव घेतला.उपस्थित सर्व साधकांच्या चेहऱ्यावर यावेळी एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

हे शिबिर संपूच नये असे सर्व उपस्थितांना वाटत होते. यावेळी सर्व साधकांनी एक विशेष आनंदाची अनुभूती घेतली.श्री क्षेत्र विघ्नहर देवस्थान ट्रस्ट ओझर चे विद्यमान अध्यक्ष श्री.गणेश भाऊ कवडे आणि देवस्थानचे सर्व मान्यवर विश्वस्त मंडळ यांनी या कार्यक्रमास विशेष सहकार्य केले. त्याचप्रमाणे मंगेश मांडे, अरविंद कवडे, अशोक मांडे, परीक्षित बोरकर , नीलम मांडे, राजश्री कवडे, जयश्री कुटे, मनीषा जगताप, प्रमिला ढवळे, शारदा कवडे, रोहिनी कवडे, योजनाताई, प्रियंका बाबर आणि इतर सर्वच मान्यवर स्वयंसेवकांनी खूपच अप्रतिम अशी सेवा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त राजश्री कवडे यांनी केले. तर आयबीएन लोकमतचे पत्रकार रायचंद शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *