लंडनमध्ये झाला शेतकरी कामगार घरातून येणाऱ्या प्रवीण निकम चा सन्मान.
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा….
७५ महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये प्रवीण निकम यांचा समावेश ब्रिटिश कॉन्सिल तर्फे पुरस्काराने सन्मानित
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावीपणे काम करणाऱ्या ७५ प्रतिभावान युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन माध्यमातून करण्यात येत आहे. या ७५ युवकांमध्ये पिंपरी चिंचवडच्या प्रवीण निकमची निवड झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लंडन येथे हा गौरवसोहळा पार पडला.
शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विदेशात असणाऱ्या उच्चशिक्षणाच्या संधीबाबत मार्गदर्शन, ५३ देशांची समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम इ.ची दखल ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन यांनी घेतली. भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, ब्रिटिश कौन्सिल शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी भारतातील ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या ७५ युवकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ७५ वर्षात ब्रिटन मध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांचं वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे, सदर अवार्ड मध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा समावेश आहे.
मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील असणारे प्रवीण यांचे वडील नोकरीसाठी शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृ