माजी गृहमंत्री दिलीप वळसे पा. यांनी थोरात कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देत केले सांत्वन

विभागीय संपादक

रवींद्र खुडे

गेल्या काही महिन्यांपूर्वी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे (न्हावरे, ता. शिरूर) व्हाईस चेअरमन ॲड. रंगनाथ थोरात यांचे शिरूर जवळील बोऱ्हाडे मळा येथे हायवेवर अपघात होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण शिरूर तालुक्यात ॲड रंगनाथ थोरात यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली गेली.  

शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांचे निकटवर्तीय असणारे कै. रंगनाथ थोरात यांचा राजकीय, सामाजिक, विधी व सर्वच क्षेत्रातील लोकांशी मोठा सलोखा होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शिरूर तालुक्यात काही प्रमाणात त्यांच्या मृत्यूमुळे पोकळी निर्माण झाली.
परंतु खऱ्या अर्थाने या दुःखातून थोरात कुटुंबीय सावरत असतानाच, एक कर्ता मुलगाही आपल्याला सोडून गेल्याने कै. राहुल थोरात यांच्या कुटुंबियांवर खूप मोठा आघात झालाय. त्यांच्या मौजे आमदाबाद, ता. शिरूर येथील निवासस्थानी अनेक नेते मंडळी, मित्र, नातलग यांनी भेट देत सांत्वन केलेय.

 


महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पा. यांनीही सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी थोरात यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत शिरूर चे माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे व वाल्मीक कुरंदळे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, शिरूर आंबेगाव विधान सभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, मलठणचे युवा नेते संदीप गायकवाड, आमदाबादचे माजी सरपंच योगेश थोरात, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष पोपट जाधव, उपसरपंच कांताराम नऱ्हे, मोहन थोरात गुरुजी, शिरूर तालुका किसान मोर्चा अध्यक्ष रामदास थोरात, माजी उपसरपंच अण्णा नऱ्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अण्णा घुले, बाभूळसरचे माजी सरपंच दशरथ फंड यांसह कुटुंबीय दीपक रंगनाथ थोरात, गं. भा. सुमन रंगनाथ थोरात, गं. भा. दिपाली राहुल थोरात, सागर थोरात, गंगाराम थोरात, ॲड साहेबराव जाधव, पुनम साहेबराव जाधव व आमदाबाद ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *