सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिले जाणारे ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान

आपला आवाज बातमी 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिले जाणारे ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ आज मुख्यमंत्री  एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, आजच्या दिनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या डॉक्टर- वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या राज्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे . आरोग्य क्षेत्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून काम केले जात आहे. रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना त्यांची आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला रुग्णवाहिका, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, मनुष्यबळ देऊन बळकटीकरण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात येत आहे. मुंबईत २५० ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. घराशेजारी आरोग्य व्यवस्था पुरविण्यासाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. मातामृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना आदी मान्यवर उपस्थित होते.

👉 ‘यांना’ प्रदान केले ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’….

✅ स्वयंसेवी संस्था – हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर, उस्मानाबाद.

✅ उत्कृष्ठ डॉक्टर्स- डॉ. प्रमोद पोतदार, शरीर विकृती शास्त्र, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती. डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर, डॉ. सदानंद राऊत, पुणे.

✅ उत्कृष्ट पत्रकार – संदीप आचार्य, सहयोगी संपादक, दैनिक लोकसत्ता, ठाणे.

✅ उत्कृष्ट कर्मचारी – धर्मा विश्वासराव वानखेडे, आरोग्य सहाय्यक, अमरावती. मिलिंद मनोहर लोणारी, स्वच्छता निरीक्षक, जळगाव. प्रशांत संभाप्पा तुपकरी, आरोग्य कर्मचारी, हिंगोली. किशोर वैद्य, आरोग्य कर्मचारी, नागपूर.

✅ दिलीप बाबूराव कचेरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, पुणे.

(प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *