ठाकरेंसाठी भाजपनं जाळं टाकलं ? राऊतांच उत्तर ऐकाच

दि. १९/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण कार्यक्रम होणार आहे. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय चर्चा जोरात सुरू झालीये. याबद्दल बोलताना संजय राऊतांनी सरकारला खडेबोल सुनावले.खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तैलचित्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याचा मुद्दा त्यांना विचारण्यात आला.

संजय राऊत म्हणाले, “प्रोटोकॉल असतो. राजशिष्टाचार असतो. आपण बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावताहेत आणि त्यांचे चिरंजीव जे राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्यांना सन्मानाने बोलवतं नाही, म्हणजे तुम्ही राजकारण करता.”उद्धव ठाकरे सांगत असतात की, बाप पळवणारी टोळी आलीये. त्यात तथ्य आहे. शिवसेनाप्रमुखांचं तैलचित्र लावता आहात आणि त्यांच्या चिरंजीवांना आमंत्रण नाही. सावरकरांचं तैलचित्र जेव्हा आम्ही लावलं, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांची पत्रिकेत नावं होती. प्रत्येक वेळेला ही प्रथा परंपरा असते”, असं राऊथ म्हणाले.

“संसदेत असो वा विधानसभेत या गोष्टी पाळतात, पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि सरकार चालवताना कोणत्याही परंपरा पाळल्या जात नाहीत, असं दिसतंय. तैलचित्रामागे काय राजकारण आहे हे सांगण्याची गरज नाही”, असंही राऊत म्हणाले.देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षनेते असताना त्यांना बोलावलं गेलं नाही, त्याचा बदला घेताहेत असं वाटतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. राऊत म्हणाले, “मला असं वाटतं नाही. फडणवीस हे बदला घेताहेत की नाही, हे मी सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रात सूड आणि बदल्याचं राजकारण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *