चास येथे घोडनदीमध्ये युवक बुडाला

दि. १०/०१/२०२३
जुन्नर


जुन्नर : आंबेगाव येथील चास येथे रांजणखळगे पाहण्यासाठी आलेला एक १८ वर्षांचा मुलगा फोटो काढताना पाय घसरून घोडनदीमध्ये बुडाला. ही घटना रविवारी घडली.

साईप्रसाद बालमालकोंडाया वेन्नापुसा (रा. हिरवेतर्फे नारायणगाव, खोडद ता. जुन्नर. मूळ रा. नेरडपल्ली आंध्र प्रदेश) असे या मुलाचे नाव आहे. तो जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प. सबनिस महाविद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे १२ वीत शिकत होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईप्रसाद याचा वाढदिवस असल्याने तो आपले मित्र आदित्य सुनील थोरवडे आणि आशुतोष राजेंद्र कोल्हे यांच्यासोबत नारायणगाव येथून दुचाकीवर रविवारी सकाळी चासकडे फिरायला गेले होते.साईप्रसाद चास येथील रांजणखळग्यांजवळ सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो घोडनदीत पडला.

याबाबत मित्रांनी त्याच्या घराच्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र,त्याचा पत्ता लागला नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *