‘मविआ’च्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात; मनसे का झाली आक्रमक ?

दि.०९/०१/२०२३
मुंबई


मुंबई : मनसेकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवरून टीका होतच असते. अशाच एका मुद्द्यावरून मनसेनं महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधलाय.महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात आहे. महाविकास आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत तर त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं की, एक किंवा दोन उद्योग राज्याबाहेर गेले तर राज्याला फरक पडत नाही. फक्त गुजरातकडे का जातात हे योग्य नाही, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणालेत.

संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. तसंच त्यांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केलीय. तसंच मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावरही आरोप केलेत.कोरोनाकाळातील टेंडरबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केलीय.एखाद्या कामाची चौकशी का होऊ शकत नाही? तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला? पालिका आयुक्तांमध्ये एवढी हिंमत कशी येते? भ्रष्टाचार झाला असेल तरी कारवाई करू नका, असा कोणता कायदा आहे?, असा सवाल त्यांनी केलाय.मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल खोटं बोलत आहेत. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित लोकांना काम कशी मिळाली? इक्बालसिंह चहल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं केली जात होती, असा आरोप देशपांडेनी केलाय. संदीप देशपांडे यांच्या आरोपांना मविआ काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *