जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी गमावला : आमदार महेश लांडगे

दि. ०३/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे नेते, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘बाहुबली’ आमदार आणि माझे मार्गदर्शक श्री. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. शहराच्या राजकारणात तब्बल ३५ वर्षे आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भाऊंनी पिंपरी-चिंचवड शहराच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी आज आपण गमावला आहे अशा शब्दात भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आमदार लांडगे म्हटले, भाऊंनी राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. पिंपरी-चिंचवड शहर एका ध्येयवादी, दूरदृष्टीच्या नेत्याला मुकले असून, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न येणारी हानी आज झाली आहे. तमाम पिंपरी-चिंचवडकर जगताप कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *