अनाथांची माय सिंधुताई सपकाळ हरपल्या, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रोहित खर्गे
विभागीय संपादक
४ जानेवारी २०२२

पुणे


अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास. अनाथांची माय हरपली. अनेक बालके पोरकी झाली. उद्या सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव मांजरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर बारा वाजता पुण्यातील नवी पेठेतील पत्रकार भवन शेजारील स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ साली वर्धा जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना त्या नको होत्या त्यामुळे त्यांचे नाव चिंधी ठेवण्यात आले होते. शिकण्याची खूप ईच्छा होती पण त्यांचे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले होते. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा २६ वर्ष वयाने मोठे असलेल्या वेक्तीशी झाला होता. त्यांनी तीन अपत्यानंतर सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जात त्यांनी हा प्रवास सुरू ठेवला. हजारो अनाथांच्या त्या माय होत्या. त्यांनी शेकडो मुलींची लग्न लावून दिली होती. त्याच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाषण केल्यानंतर अनाथ मुलांसाठी झोळी पसरत असत. लोकही त्यांना भरभरून मदत करत असत.

देश विदेशात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाने सन्मानित केले होते. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अनाथांची माय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय सामाजिक वेक्तींनी श्रद्धांजली वाहिली. सिंधुताईचे सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. शरद पवारांकडून श्रद्धांजली. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही वाहिली श्रद्धांजली. सिंधुताई चे जाणे मनाला अस्वस्थ करणारी घटना आहे.जितेंद्र आव्हाड यांची श्रद्धांजली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, नीलम गोऱ्हे, रोहित पवार, चंद्रकांत दादा पाटील व अनेक राजकीय व सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांनी ट्विटर व सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.

सिंधुताईंच्या जीवनावर मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांचे सामाजिक काम जगभर पोहचले होते.सर्वाना आपलेसे वाटणारी माय आता आपल्यात नाही. त्यांना आपला आवाजच्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *