जुन्नर तालुका पर्यटन दिनदर्शिका २०२२ चा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते तर प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, महापौर माई ढोरे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले

रोहित खर्गे
विभागीय संपादक
४ जानेवारी २०२२

पुणे


जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. यावेळी दीपक सोनवणे यांनी दिनदर्शिकेची माहिती अण्णा हजारे यांना दिली व ती पाहून अण्णांनी शुभेच्छा दिल्या व अशा प्रकारची अनोखी दिनदर्शिका पहिल्यांदाच पाहतोय असे सांगितले. तर दिनदर्शिकेचे प्रकाशन संत तुकाराम महाराजांचे वंशज, पंजाब घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यनगरीत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या दालनात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ‘ड ‘ प्रभाग अध्यक्ष सागर ओंघळकर , नगरसेवक राजेंद्र गावडे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, कार्याध्यक्ष रोहित खर्गे, मुख्य संघटक अण्णासाहेब मटाले, दिनदर्शिका संकलक व निर्माते दिपक सोनवणे यांचा उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी महापौर माई ढोरे यांनीही दिनदर्शिका पाहून कौतुक केले व बोलताना त्या म्हणाल्या जर आपण शांतपणे ही दिनदर्शिका पाहिली व यात पर्यटनाविषयी दिलेल्या माहितीचे वाचन केले तर प्रत्येक्षात पर्यटनाला गेल्याचा भास होतो. मंडळाने अशी दिनदर्शिका प्रकाशित केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले व नागरिकांसाठी ही दिनदर्शिका म्हणजे संग्रही ठेवण्याचा ठेवा आहे असे म्हणाल्या. गेल्या चार वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील निसर्ग तसेच पर्यटनाची ओळख या पर्यटन दिनदर्शिकेत करुन देण्यात येत आहे. तसेच यावेळी नव्याने समाविष्ट जुन्नर तालुक्यातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या अलौकिक व्यक्तिमत्वांची ओळख खास वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. पर्यटन माहिती माजी सैनिक व वनरक्षक मा.रमेश खरमाळे तर व्यक्तिविशेष स्तंभलेखक मा.संजय नलावडे यांनी लेखन केली असून त्याचे संकलन व निर्मिती दिपक सोनवणे, नवनाथ नलावडे अण्णासाहेब मटाले यांनी केले आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, उपाध्यक्ष ऍड संतोष काशीद, मंडळाचे मार्गदर्शक इंजिनीयर कवी शिवाजीराव चाळक, वादळकार कवी राजेंद्र सोनवणे, सहसचिव योगेश आमले , संपर्कप्रमुख उल्हास पानसरे , कार्यकारिणी सदस्य मीननाथ सोनवणे, इंद्रजीत पाटोळे, सुनील पाटे , नितीन शिंदे , मंगेश कुटे, मंगेश तांबोळी , प्रतिभा सोनवणे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *