पुष्पावती विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न….

दिपक मंडलिक
माळशेज प्रतिनिधी
३ जानेवारी २०२२

डिंगोरे


डिंगोरे [ ता.जुन्नर ]…येथील पुष्पावती विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईकर मंडळाचे सचिव मा.वसंतराव लोहोटे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शिक्षणावर अतोनात प्रेम करणा-या डुंबरे परिवाराच्यावतीने श्री.धनंजय डुंबरे व नितीन डुंबरे यांनी कै.चैतन्य डुंबरे यांच्या स्मरणार्थ गरीब- होतकरु-हुशार व गरजू आशा विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले.त्याचप्रमाणे चैतन्य फाऊंडेशनच्यावतीने स्व.चैतन्य यांच्या स्मरणार्थ लेखन साहित्याचे वाटप केले.यावेळी चैतन्य फाउःडेशनचा मित्रपरिवार उपस्थितीत होता.

या कार्यक्रमाच्यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे, खजिनदार रघुनाथशेठ तांबे,वैभव पाडेकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुभाऊ मंडलिक, नितीनराव डुंबरे,धनंजयराव डुंबरे,रामदास घुले चैतन्य फाउंडेशनचा सर्व मित्रपरिवार उपस्थित होता.नितीन डुंबरे, साक्षी आहेर, सौ. भोर मँडम, वसंतराव लोहोटे यांनी मनोगते व्यक्त करताना सावित्रीबाईंना अभिवादन केले.व नूतन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्या.श्री.अस्वार सर, सत्कार व गणवेश वितरण नियोजन श्री. उकिर्डे सर व घोलप सर यांनी केले.तर आभार विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी डुंबरे सर यांनी तर सूत्रसंचालन श्री.शितोळे सर यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *