शरद पवारांनी नरेटिव्ह सेट करण्याआधी अनिल देशमुखांच्या जामीनाबद्दल कोर्टाचे आदेश वाचावेत – देवेंद्र फडणवीस

३१ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्य सरकारवर टीका केली. अनिल देशमुख यांच्या सुटकेवर बोलत असताना ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर होतोय, हे आम्ही सातत्याने सांगतोय. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याबाबत हे दिसून आले आहे. अनिल देशमुख यांना जामीन देत असताना कोर्टाने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेख शरद पवार यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही. त्या विषयात ईडी किंवा सीबीआय बोलेल. शरद पवार यांनी नरेटीव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या जामीनाबद्दल कोर्टाचे आदेश वाचावेत. मग नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा, मग तुमच्या लक्षात येईल कोर्टाने काय म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *